
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग सध्या जगभर पसरलेला आहे. या संकट काळात एक धक्कादायक वृत्त समोर आले. 33 वर्षीय फुटबॉलपटूने आपल्या 5 वर्षीय कोरून संशयित मुलाची हत्या केली. त्यांनतर तो स्वतः पोलिसांना शरण गेला आणि उशीनं मुलाचं तोंड दाबून हे कृत्य केल्याची कबुली दिली. माजी फुटबॉलर च्येफर टोकटाश (Cevher Toktas) असं या खेळाडूचं नाव आहे. सुरुवातीला मुलाचा मृत्यू संशयास्पद मानला जात नव्हता. महत्वाची गोष्ट म्हणजे उपचार घेत असलेल्या 5 वर्षीय कासिमचा अहवाल आल्यानंतर त्याला करोनाची लागण झालेली नसल्याचं समोर आलं होतं. तपासणीचा भाग म्हणून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या अनाडोलू एजन्सीने दिली आहे. दरम्यान, हबरटर्क टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार सध्या हौशी लीग टीम बर्सा येल्डिरीमस्पोरबरोबर खेळणार्या टोकटाशने पोलिसांना सांगितले की त्याने आपल्या मुलावर प्रेम केले नाही म्हणूनच त्याने त्याला मारेल आणि त्याला पश्चात्ताप झाल्याने त्याने 11 दिवसांनंतर पोलिसांकडे आत्पसमर्पण केलं. (Coronavirus: बांग्लादेशचे विकास प्रशिक्षक आणि माजी प्रथम श्रेणी क्रिकेटर आशिकुर रहमानची COVID-19 टेस्ट पॉसिटीव्ह)
खोकला आणि ताप जाणवल्याने मुलाला पश्चिमोत्तर प्रांतातील बर्साच्या मुलांच्या इस्पितळात 23 एप्रिलला दाखल करण्यात आले आणि त्याच्या वडिलांसोबत त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणात च्येफरला अटक केली आहे. आत्मसमर्पण केल्यावर टोकटाश म्हणाला की,"मला कासीम (Kasim) आवडत नव्हता आणि म्हणून मी त्याची हत्या केली. तो पोटावर झोपला असताना मी त्याच तोंड 15 मिनिटांसाठी उशीनं दाबून ठेवलं. तेव्हा त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्याची हालचाल थांबली आणि मी डॉक्टरांना आवाज दिला." कासीमला ICU मध्ये नेण्यात आले परंतु 2 तासानंतर त्याचा मृत्यू झाला. टोकटाशविरुद्द खटल्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही.
2007 आणि 2009 च्या दरम्यान, टोकटाश हेसेटटेप सॉकर संघाकडून खेळला. मात्र निवृत्तीनंतर तो स्थानिक संघांकडून खेळत होता. दुसरीकडे, जगभरात कोरोना संक्रमिताची संख्या वाढत जात आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 45 लाखांच्या वर गेला आहे, तर यामुळे 303,345 लोकांचा मृत्यू झाला आहे.