Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकनंतर पंतप्रधान मोदी ‘या’ स्टार खेळाडूसोबत खाणार आईसक्रीम, जाणून घ्या आहे तो किस्सा (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी, पीव्ही सिंधू आणि पालक (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत भाग घेणाऱ्या अनेक भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मंगळवारी ऑनलाईन चर्चा केली. यादरम्यान, त्यांनी काही खेळाडूंना असे प्रश्न विचारले, जे चर्चेचा विषय बनले आहेत. स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या (PV Sindhu) आईस्क्रीमशी संबंधित जुना किस्सा देखील मोदींनी शेअर केला आणि भारताची स्टार शटलर पुढील महिन्यात ऑलिम्पिक (Olympics) 2020 स्पर्धेतून मायदेशी परतल्यावर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिच्यासोबत आईस्क्रीम खाण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी टोकियोला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंशी व्हिडिओ संवाद साधताना पंतप्रधानांनी सिंधूला खेळानंतरच्या त्यांच्या योजनांबद्दल विचारताना सांगितले. आता लोक सिंधूची आईस्क्रीम स्टोरी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. (Tokyo Olympics 2020 Badminton Draw: शटलर PV Sindhu हीच मार्ग सुलभ, सात्विकसाईराज-चिराग शेट्टीच्या जोडी समोर कठीण ड्रॉ)

चर्चेच्या सुरूवातीला पंतप्रधानांनी पीव्ही सिंधूला त्यांच्या सरावविषयी विचारले. यानंतर मोदी म्हणाले, “मला आठवते की रिओ ऑलिम्पिकपूर्वी गोपीचंद जींनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांनी आपला फोन घेतला होता. आपल्याला आईस्क्रीम खाण्याची परवानगी नव्हती. आपल्यावर अद्याप आईस्क्रीम खाण्यास बंदी आहे की तुम्हाला काही सूट आहे?” सिंधूने हसत उत्तर दिले की, “मी अजूनही यावर नियंत्रण ठेवते. खेळाडूसाठी त्याचा आहार खूप महत्वाचा असतो. आता ऑलिम्पिक आहे, त्यासाठी मी डायट कंट्रोल करते. पण मी इतकं आइस्क्रीम खात नाही. मी फक्त कधीकधी खाते.” यावर मोदी म्हणाले, “मला खात्री आहे की आपण या वेळी नक्कीच यशस्वी व्हाल. यशानंतर मला भेटायचं झाल्यास मी तुझ्याबरोबर आईस्क्रीमही खाईन.” दरम्यान सिंधू ब्राझीलमधील खेळांमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती भारताची पहिली बॅडमिंटनपटू ठरली.

दुसरीकडे, विश्वविजेती आणि रिओ गेम्सची रौप्यपदक विजेती सिंधूला टोकियो खेळात महिला एकेरीच्या J गटात स्थान मिळाले असून तिचा सामना हॉंगकॉंगच्या उंग न्गन यी आणि इस्त्राईलची केनिया पॉलिकार्पोवाशी होईल. सिंधू टोकियो खेळात पात्रता मिळवणारी एकमेव भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. टोकियो ऑलिम्पिक 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत जपानच्या राजधानी शहरात आयोजित केली जाईल. 24 जुलैपासून बॅडमिंटन सामन्यांची सुरुवात होईल.