Tokyo Olympics 2020 Badminton Draw: विश्वविजेती व रिओ ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूला (PV Sindhu) टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुलभ ग्रुप-स्टेज ड्रॉ देण्यात आला आहे. सिंधूला 13 जुलैपासून रंगणाऱ्या स्पर्धेत महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत 6 वे मानांकन मिळाले आहे. बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सिंधू एकमेव भारतीय खेळाडू आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सिंधूला ग्रुप J मध्ये स्थान देण्यात आले आहे. सिंधूचा गटात हाँगकाँगच्या 34व्या क्रमांकाच्या चेउंग न्गन यी आणि इस्त्राईलच्या केसेनिया पोलिकार्पोवा यांच्याशी सामना होईल. तसेच अंतिम 16 मध्ये तीच सामना जागतिक क्रमवारीतील 12व्या स्थानावरील Mia Blichfeldt शी होण्याची शक्यता आहे. (Tokyo Olympic Games: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांच्यावर बंदी)
खेळाडूंना 14 गटात विभागण्यात आले आहे आणि ग्रुप ए व पी विजेत्या (अव्वल 2 मानांकन गट) यांना राऊंड ऑफ 16 मध्ये बाय मिळतील. दरम्यान, जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेता बी साई प्रणीतला (B Sai Praneeth) 13 वे मानांकन मिळाले असून तो गट D मध्ये आहे. ग्रुप सामना जिंकल्यास त्याचा सामना चिनी ताइपेच्या Angus Ka Long शी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ग्रुप ए मध्ये स्थान मिळालेल्या भारताची पुरुष दुहेरी जोडी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांना कठीण ड्रॉ देण्यात आला आहे. भारताच्या या जोडीचा सामना अव्वल मानांकित इंडोनेशियाच्या केविन संजया सुकामुलजो आणि मार्कस फर्नाल्डी गिदोन, चिनी तैपेईची जागतिक क्रमांकाची तिसरी जोडी ली यांग आणि वांग ची लिन व इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन वेंडीच्या 18 व्या क्रमांकावरील जोडीशी होईल. प्रत्येक गटातील विजेता आणि उपविजेत्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल.
दरम्यान, टोकियोमध्ये वाढत्या करोना संकटामुळे जपान सरकारने तज्ञांशी झालेल्या बैठकीनांतर टोकियोमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी लागू केली आहे. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.