Indian Men's Hockey Team (Photo Credits: @TheHockeyIndia/Twitter)

एक-दोन नव्हे तर तब्बल 4 दशकांचा दुष्काळ संपवत भारतीय पुरुष हॉकी संघाने ( Indian Men's Hockey Team) दमदार कामगिरी करत टोक्यो ओलम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) कांस्य पदक पटकावले. भारताने जर्मणी (Germany) सोबत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अंतिम बाजी मारली आणि विजयपताका फडकावली. भारताने जर्मणीसोबत झालेल्या सामन्यात हा विजय 5-4 अशा फरकाने मिळवला आणि कांस्य (Bronze Medal) पदकावर नाव कोरले. टोक्यो ओलंपीक स्पर्धेतील भारताने मिळवलेले हे चौथे पदक आहे .

ओलम्पिक स्पर्धेत भारताचा सामना तगड्या जर्मणीसोबत होता. दोन्ही संघांना सेमीफायनल सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे कांस्य पदकासाठी दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हाता तोंडाशी आलेले सूवर्ण आणि रौप्य पदक दूर गेल्यामुळे दोन्ही संघामध्ये एक रुखरुख होती. त्यामुळे कांस्य पदकावर दावा सांगण्यासाठी दोन्ही संघ सर्वशक्तीनिशी एकवटले होते. दोन्ही संघांनी खेळीही तशीच साजेशी केली. अंतिम खेळी मात्र भारताचीच वरचढ ठरली. शेवटच्या गोलमुळे भारताचे पारडे 5-4 ने जड झाले. ज्याने भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

भारत विरुद्ध जर्मणी या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मणीकडून ओरुज टिमूर याने गोल केला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. त्यावर दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिमरनजीत सिंह याने गोल केला आणि सामना बरोबरीत आला. दरम्यान, दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मणीने पुन्हा एकापाठोपाठ दोन गोल केले आणि चित्र जर्मणी 3 भारत 1 असे निर्माण झाले. यावर दबावात असलेल्या भारताने हार्दिक सिंह याच्या नंतर हरमनप्रीत सिंह याच्या रुपात पेनर्टी कॉर्नरवरुन दोन गोल केले आणि जर्मणीची बरोबरी साधली. (हेही वाचा, Tokyo Olympics 2020 Medal Tally Updated: टोकियो ऑलिम्पिक खेळाच्या पदक क्रमवारीत पाहा भारताची स्थिती, कोणता देश आहे नंबर 1; इथे पाहा संपूर्ण पॉईंट्स टेबल)

ट्विट

दुसऱ्या क्वार्टरनंतर सामना 3-3 अशा बरोबरीत आला. दरम्यान, तिसऱ्या क्वार्टरमध्ये दमदार सुरवात करत भारताने एकापाठोपाठ एक असे दोन गोल केले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या रुपिंदर पाल सिंह यांनी गोल केला. त्यामुळे आघाडी 5-3 अशी झाली. तिसऱ्या क्वर्टरमध्ये भारत 5-3 असा आघाडीवर होता. शेवटी 15 मिनिटांच्या चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने एक गोल केला. जर्मणीच्या संघाच्या वतीने विंडफेडर याने गोल केला आणि फरक कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थिती 5-4 अशी झाली. परंतू, भारताच्या भक्कम बचावापुढे जर्मणीला पुढे हालचालच करता आली नाही.