सायना नेहवाल

भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल (Saina Nehwal) बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर पडली आहे. अंतिम 16 च्या फेरीत सायना डॅनिश खेळाडू मिया ब्लिचफेल्ड (Mia Blichfeldt) हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. सायनाच्या पराभवानंतर तिचा नवरा आणि स्वत: बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) यांनी केलेल्या ट्विटवर चर्चांना पंख फुटली आहे. कश्यपने सायनाच्या मॅचदरम्यान पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि स्वत: सायनानेही ट्विटरद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. सायनाच्या पराभवानंतर कश्यपने ट्विटमध्ये लिहिले की, "खराब पंचगिरीचा फटका सायनाला या सामन्यात बसला. पंचांच्या वाईट कामगिरीमुळे सायनाकडून दोन मॅच पॉइंट्स हिरावले गेले. त्याचबरोबर पंचांकडून बरेच वाईट निर्णय पाहायला मिळाले." (BWF World Championship 2019: पीव्ही सिंधू हीचा संघर्षपूर्ण विजय, Tai Tzu Ying हिला पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश)

दुसरीकडे, कश्यपच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत सायनाने लिहिले की, "मला अजूनही विश्वास होत नाही की दोन मॅच पॉईंट्स ज्याला पंचाने अधिलिखित केले होते, आणि मग दुसऱ्या गेमच्या वेळी पंच मला म्हणाले, 'लाइन अंपायरला त्यांचे काम करु दे. आणि पंचांनी अचानक दोन्ही गुणी कसे ओव्हररूल केले हे मला समजत नाही. Very Sick"

ऑलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवालला डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डकडून पराभवानंतर प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. आठव्या मानांकित सायनाला 12 व्या मानांकित ब्लिचफेल्डने एक तास 12 मिनिटांच्या सामन्यात 15-21, 27-25, 21-12 ने पराभूत केले. पहिला गेम सायनाने जिंकला, तर ब्लिकफिल्डने दुसरा आणि तिसरा गेम जिंकत मॅच जिंकली. सायनाने 2015 मध्ये जकार्ता येथे रौप्य आणि ग्लासगोमध्ये 2017 च्या सामन्यात कांस्यपदकाही कमाई केली आहे.