Rohan Bopanna: रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक,  मेन्स डबल्समध्ये जागतिक क्रमवारीत पोहोचला अव्वल स्थानी
(Photo Credit - Instagram)

भारतीय टेनिस (Tennis) स्टार रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) आणि मॅट एबडेन (Matthew Ebden) यांनी ऑस्ट्रेलियन ओपनची (Australian Open) सेमीफायनल गाठली आहे. 44 वर्षांच्या रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी क्वॉर्टरफायनलचा सामना 6-4, 7-6 (7-5) नं जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. रोहन आणि मॅटनं आपल्या या विजयासोबतच आणखी एक विक्रम रचला आहे. रोहन आणि मॅट मेन्स डबल्समध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत.

पाहा पोस्ट -

या सामन्यात मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव झाला. रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेननं ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. याआधी रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅट एबडेन यांनी नेदरलँडच्या वेस्ली कूलहॉफ आणि क्रोएशियाच्या निकोला मेक्टिक या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.