Rafael Nadal Wedding: राफेल नडाल आणि गर्लफ्रेंड मारिया फ्रान्सेस्का पेरेलो यांनी बांधली साता जन्माची गाठ, पहा Photos
Rafael Nadal and Xisca Perello (Photo Credits: Instagram)

स्पेनचा प्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याने शनिवारी आपली 19 गर्लफ्रेंड सिस्का पेरोलो (Maria Francisca Perello) बरोबर प्रसिद्ध 'ला फोर्टालिझा' येथे लग्न केले. 33 वर्षीय नदालने आपल्या लग्नासाठी निवडलेल्या पॅलेसमध्ये 2016 साली बीबीसीचे प्रसिद्ध चित्रपट 'नाईट मॅनेजर' ची शूटिंग झाली होती. लग्नाला उपस्थित राहण्यासाठी नदालच्या पाहुण्यांसाठी विशेष हेलिकॉप्टर मागविण्यात आले होते. वेल्सचा फुटबॉलपटू गॅरेथ बेल यानेही त्याच ठिकाणी लग्न केले. याशिवाय, कार्लोस मोया यांसारख्या दिग्गज टेनिसपटूंचेही येथे लग्न याच पॅलेसमध्ये झाले आहे. 19 ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या नदालने मागील वर्षी पेरेलोशी साखरपुडा केला होता. आणि रोममध्ये हॉलिडेदरम्यान तिला लग्नाची मागणी केली होती. नदाल आणि पारोलो गेल्या 14 वर्षांपासून एकत्र राहत आहेत. (King Of Clay राफेल नडाल अडकला विवाहबंधनात)

नदाल-पेरेलोचे त्यांच्या राहत्या शहरी मलोरकामध्ये लग्न झाले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात नडाल आणि त्याची गर्लफ्रेंड सिस्का लग्नाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. पहा हे फोटोज:

पाहुणे येताना

31 वर्षीय सिस्का एक गुंतवणूक बँकर होती. तिने काही काळानंतर नोकरी सोडली आणि राफेल नडाल संस्थेत प्रकल्प संचालक म्हणून काम करण्यास सुरवात केली. हा चॅरिटेबल ट्रस्ट 10 वर्षांपूर्वी नदालने सुरू केला होता. इतकी वर्ष सिस्काने स्वत: ला कोणत्याही प्रकारच्या लाईमलाईटपासून दूर ठेवले आहे. ती कोणत्याही सोशल मीडियावर सक्रिय नाही आहे. शिवाय, नडालच्या कोणत्याही सामन्यादरम्यान ती कधीकधी स्टेडियममध्ये हजर असते.