King Of Clay राफेल नडाल अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये  Wedding फोटोज पाहण्याची उत्सुकता
(Photo Credit: Getty)

19 ग्रँड स्लॅम जिंकणाराव टेनिस दिग्गज राफेल नडाल (Rafael Nadal) त्याची गर्लफ्रेंड मारिया फ्रान्सेस्का पेरेलो (Xisca Perello) सह विवाहबंधनात अडकला आहे. नदाल आणि मारिया 2005 पासून एकमेकांना डेट करत होते. जवळपास 14 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांचाही साखरपुडा करण्यात आला होता. होला मासिकाच्या वृत्तानुसार, मागील वर्षी रोममध्ये सुट्टीदरम्यान नदालने पेरेलोला लग्नासाठी प्रस्ताव दिला होता. लग्नाच्या सोहळ्याचे फोटो अद्याप शेअर केले गेले नाहीत. तरीही डिझायनर रोज क्लोरा ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मारियाच्या लग्नाच्या गाऊनची झलक दिसून येत आहे. सोशल मीडियावर नडाल आणि सिस्का यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

नडाल आणि सिस्काचे लग्न त्यांच्या मॅलोर्का शहरात झाले होते. व्यवसायाची पदवी घेतलेली पेरेलो एक गुंतवणूक बँकर आहे आणि राफंडल फाऊंडेशनमध्ये प्रकल्प संचालक म्हणून काम करते.

30 वर्षीय मारिया पेरेलोने आतापर्यंत स्वत:ला सर्व प्रकारच्या लाइमलाइटपासून दूर ठेवले आहे. ती कुढल्याही प्रकारे सोशल मीडियावर सक्रीय नाहीत. शिवाय, नडालसोबत ती कोणत्याही कार्यक्रमात किंवा त्याचा सामना पाहायला क्वचितच हजर असते. दरम्यान, यापूर्वी नदाल आणि सिस्का माजोरकाच्या 'ला फोर्टालिझामध्ये लग्न करणार असल्याचे ‘द सन’ च्या अहवालानुसार म्हटले जात होते. शिवाय, नदालच्या लग्नात 350 लोक उपस्थित होते. मागील चार दशकांपासून स्पेनचा राजा असलेले जुआन कार्लोस (Juan Carlos) प्रथम देखील नदालच्या या खास क्षणात सहभागी झाले होते.