प्रो कब्बडी लीगPhoto Credits: Facebook @ProKabaddi)

क्रिकेटनंतर टेलिव्हिजन वर सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ म्हणजे कब्बडी. आज पासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून Pro Kabaddi League चं सहावं पर्व सुरु होणार आहे. एकूण १२ संघांमध्ये यंदा सामने रंगणार आहेत. त्यामुळे पुढील चार महिने प्रो कब्बडी प्रेमींसाठी खास असणार आहेत. आज चैन्नईत पटणा विरुद्ध तामिळ असा पहिला सामना रंगणार आहे.

कुठे पाहाल सामाने ?

प्रो कब्बडी लीगचे सामने रोज रात्री आठ वाजता सुरु होणार आहेत. हे सामने स्टार स्पोर्ट्सवर थेट पाहता येणार आहेत. तसेच रात्रीच्या वेळेस तुम्ही प्रवासात असाल तर सामान्यांचं लाईव्ह स्टीमिंग पाहण्याची सोया करण्यात आली आहे. हॉटस्टार ऍपवर या सामान्यांचं डिजिटल स्ट्रीमिंग पाहता येईल. कोणत्या दिवशी कोणता सामना असेल हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

विजेत्यांची यादी

प्रो कब्बडी लीगचे ५ सीझन रंगले आहेत. त्यापैकी ३ सीझन पाटणाने जिंकले आहेत. जपपुर पिंक पँथर ने पहिला सिझन तर यू मुंबाने दुसरा सिझन जिंकला आहे. यंदा कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.