Pro Kabaddi League 2019: Puneri Paltan वर मात करत Haryana Steelers ने पहिल्याच सामन्यात मारली बाजी
Pro Kabaddi League 2019 | Puneri Paltan vs Haryana Steelers | (Photo Credits: Twitter)

प्रो कबड्डी लीग 2019 (Pro Kabaddi League) मधील पहिल्याच सामन्यात हरियाणा स्टिलर्सने पुणेरी पलटणवर मात करत यशाची मुहर्तमेढ रोवली. आज (22 जुलै) रंगलेल्या पुणेरी पलटन (Puneri Paltan) विरुद्ध हरियाणा स्टिलर्स (Haryana Steelers) या सामन्यात 34-24 च्या फरकाने हरियाणाने बाजी मारली. हरियाणा टीममधील नवीन आणि सेल्वामणी यांच्या चढायांनी पुणे संघाची दाणादाण उडवून दिली. या चढायांवर अंकुश लावण्यात अपयशी ठरलेला पुणे संघ बॅकफूटवर गेला. शुभम शिंदेने आपल्या खेळीने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ही फारशी कमाल करु शकला नाही. त्यामुळे पहिल्या सत्रात हरियाणाने 22-10 अशी आघाडी घेतली. (आज होणार Puneri Paltan vs Haryana Steelers मध्ये चुरशीची लढत)

दुसऱ्या सत्रात पुणे संघाने हरियाणा संघावर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यात पवन कादीयान, मनजीत आणि शहाजी जाधव यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. मात्र बचावफळीतल्या समन्वयाचा अभावामुळे हरियाणा संघाला 34-24 अशी आघाडी घेण्यात यश आले आणि अखेर हरियाणा संघ विजयी ठरला. (Pro Kabaddi League 2019: Jaipur Pink Panthers ची विजयी सुरुवात; U Mumba संघावर मात)

प्रो कबड्डी ट्विट:

प्रो कबड्डीमधील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असून यात पुण्यावर हरियाणा संघाने मात करत स्पर्धेची यशस्वी सुरुवात केली.