पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियाने रोनाल्डो (Ronaldo) याला पुत्रवियोग (Cristiano Ronaldo’s Newborn Baby Boy Dies झाला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती आपले चाहते आणि हितचिंतकांना दिली आहे. रोनाल्डोने 18 एप्रिलच्या रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार) एक ट्विट करुन ही माहिती दिली. रोनाल्डो (Cristiano Ronaldo ) आणि त्याची पत्नी जॉर्जिना (Georgina Rodríguez) यांनी याबाबत एक संयुक्त वक्तव्य देत माहिती दिली. रोनाल्डो दाम्पत्य जुळ्या मुलांना जन्म देणार होते. त्यांनी मुलगा आणि मुलगी अशा जुळ्यांना जन्मही दिला. मात्र, दरम्यान, मुलाचा मृत्यू झाला. मुलगी सुरक्षीत आहे.
क्रिस्टियानो याने आपल्या संदेशात म्हटले आहे की, आम्हाला मोठ्या जड अंत:करणाने हे सांगावे लागत आहे. आमच्या नवजात बाळाचे निधन झाले आहे. कोणत्याही आई-वडीलांसाठी हे सर्वात मोठे दु:ख आहे. आमच्या मुलाचा जन्म आम्हाला शक्ती देतो. तसेच आमची कन्या हे दु:ख झेलण्याचीही ताकद देतो. आम्ही सर्व डॉक्टर्स आणि नर्सचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला चांगले सहकार्य केले. (हेही वाचा, Danish Open 2022: आर माधवनचा मुलगा वेदांतने जिंकले रौप्य पदक, ट्विट करून केले अभिनंदन)
रोनाल्डो याने पुढे म्हटले आहे की, या मृत्युमुळे आम्ही निराश झालो आहोत. आम्ही सर्वांना विनंती करतो की आपले व्यक्तीगत जीवनाची सर्वांनी काळजी घ्यवी. आमचा मुलगा आमच्यासाठी एक ईश्वराने दिलेली भेट होती. आम्ही त्याच्यावर कायम प्रेम करु.
ट्विट
— Cristiano Ronaldo (@Cristiano) April 18, 2022
क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची सहचारीणी जॉर्जिना यांनी ऑक्टोबर महिन्यात विवाह केला. ते जुळ्या बाळाचे आई-वडील होणार होते. दोघांनी रुग्णालयातून एक संयुक्त छायाचित्रही शेअर केले होते. या दोन्हीपैकी एका मुलाचा मृत्यू झाला. तर मुलगी सुरक्षीतपणे जन्माला आली.