Commonwealth Games 2022 मध्ये भारताची आणखी एका पदकाची कमाई, भारतीय बॅडमिंटन संघाने पटकावलं रौप्य पदक
पीव्ही सिंधू (Photo Credit: PTI)

भारताचा यावेळी Commonwealth Games 2022 मध्ये चांगलाच बोलबाला बघायला मिळाला.  विविध खेळात सुवर्ण(Gold Medal), कांस्य (Bronze Medal),रौप्य (Silver Medal) अशी विविध पदकांची कमाई यावेळी भारताने (India) केली आहे. आता भारतीय बॅडमिंटन (Badminton) संघाने (Badminton Team India) भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय बॅडमिंटनपटूंनी कमाल कामगिरी करत रौप्य पदक भारताच्या नावी नोंदवलं आहे. अखेरच्या सामन्यात भारताला मलेशियाविरुद्ध (Malaysia) पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदक मिळालं आहे तरी भारत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदाच्या अख्तारीत असलेला मानकरी होता.बॅडमिंटनच्या फायनलच्या (Badminton Final) सामन्यात भारत 3-1 च्या फरकाने पराभूत झाला.

 

मलेशियाविरुद्धच्या सामन्यात सर्वात आधी पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक रंकीरेड्डी (Satvik Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) सामन्यात पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे मलेशियाने सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर महिला एकेरीचा सामना पार पडला. यामध्ये भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (P V Sindhu) मलेशियाच्या जिन गोहला 22-20 आणि 21-17 अशा सरळ सेट्समध्ये मात देत विजय मिळवला.त्यानंतर सामना पुरुष एकेरीचा किदम्बी श्रीकांत (Kidambi Shrikant) आणि योंग (Yongi) यांच्यात पार पडला आणि 19-21, 21-6, 16-21 च्या फरकाने पराभूत झाला. अखेरचा सामना ट्रेसा जॉली (Tross Jolly) आणि गायत्री गोपिचंद (Gayatri Gopichand) ही जोडी देखील ने पराभूत झाल्यामुळे सामना भारताने 3-1 ने गमावला. ज्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. (हे ही वाचा:-)

 

भारताच्या रौप्य पदकाच्या कमाईवर बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधून प्रतिक्रीया दिली आहे सुवर्णपदक मिळवल्याचं जरा दुख आहे पण विजय (Victory) आणि पराजय हा खेळाचा इक भाग आहे. गमावलेल्या या विजयाकडून बरेच काही शिकण्यासारखं आहे तर पुढल्या वेळी खेळण्यासाठी आणखी तयारी करेन तसेच एकेरीत सुवर्णपदक मिळवण्याची आशा पी व्ही सिंधूनी व्यक्त केली आहे.