Mandeep Singh COVID-19 Positive: भारतीय हॉकी संघाचा स्ट्रायकर मनदीप सिंह कोविड-19 पॉसिटीव्ह, एसिम्प्टोमॅटिक असल्याची SAI कडून माहिती
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

बंगळुरु येथील राष्ट्रीय शिबिराच्या आधी कोरोना व्हायरस (Coronavirus) पॉसिटीव्ह आढळणारा मनदीप सिंह (Mandeep Singh) हा सहावा राष्ट्रीय हॉकीपटू बनला आहे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) सोमवारी याची माहिती दिली. कर्णधार मनप्रीत सिंहसह अन्य पाच खेळाडूंसोबत उपचार घेत असलेला जालंधरचा 25 वर्षीय मनदीप एसिम्प्टोमॅटिक असल्याचं साईने म्हटलं. मनदीप आणि मनप्रीत व्यतिरिक्त डिफेन्डर सुरेंदर कुमार, जसकरण सिंह, ड्रॅग-फ्लिकर वरुण कुमार आणि गोलकिपर कृष्ण बहादुर पाठक यांनाही 20 ऑगस्टपासून राष्ट्रीय शिबिर सुरू होणार्‍या एसएआय सेंटरमध्ये परतल्यानंतर प्राणघातक व्हायरसची सकारात्मक लागण झाली. “भारतीय पुरुष हॉकी संघाचा सदस्य मनदीप सिंह ज्याने बेंगळुरूच्या साईच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स येथे नॅशनल कॅम्पमध्ये 20 इतर खेळाडूंसहकोविड टेस्ट (RT-PCR) केली, कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला, पण तो एसिम्प्टोमॅटिक आहे,” SAI ने एका निवेदनात म्हटले. मंदीप हॉकी संघाचा सहावा खेळाडू आहे ज्याची कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आढळली आहे. (Coronavirus: भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह करोना पॉझिटिव्ह, अन्य तीन खेळाडूंनाही करोनाची लागण)

"पॉझिटिव्ह टेस्ट असलेल्या इतर पाच खेळाडूंसह त्याच्यावरही डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत." SAI डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सर्व खेळाडू केवळ “सौम्य लक्षणे” दाखवत होते आणि चांगले काम करत आहेत. त्यांना बेंगळुरूच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी, या विषाणूचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय लॉकडाउन करण्यात आले होते तेव्हा खेळाडू दोन महिन्यांपूर्वी (जूनपर्यंत) केंद्रात अडकले होते.

ब्रेकमधून परत आल्यानंतर, खेळाडू केंद्रात प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यापूर्वी अनिवार्य क्वारंटाइन करण्यात आले आहे. भारतातील कोविड -19 मृत्यूची संख्या 45,000 च्या जवळपास असून संक्रमितांची संख्या 22 लाखांच्या पुढे पोहचली आहे.