भारतीय पुरुष हॉकी संघाचा (India men's Hockey Team) कर्णधार मनप्रीत सिंह (Manpreet Singh) व अन्य तीन खेळाडूंची बेंगळुरू येथे राष्ट्रीय शिबिरापूर्वी कोविड-19 (COVID-19) टेस्ट सकारात्मक आल्याचे आढळून आले आहे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने म्हटले आहे. मनप्रीत याच्याशिवाय डिफेन्डर सुरेंदर कुमार, जसकरण सिंह आणि ड्रॅग-फ्लिकर वरुण कुमार यांना देखील प्राणघातक विषाणूची सकारात्मक लागण झाली आहे. “मी SAI कॅम्पसमध्ये स्वत:ला क्वारंटाइन करत आहे आणि SAI अधिकाऱ्यांनी ज्या परिस्थितीत स्थिती हाताळली आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे...मी ठीक आहे आणि लवकरच बरे होण्याची आशा आहे," SAIने दिलेल्या निवेदनात भारतीय कर्णधाराने म्हटले. महिनाभराच्या विश्रांतीनंतर बेंगळुरूच्या साई दक्षिण केंद्रातील राष्ट्रीय हॉकी शिबिरात परतल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ या विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या राष्ट्रीय लॉकडाउनमुळे ते केंद्रात अडकले होते. (Coronavirus: ब्रायन लारा COVID-19 पॉसिटीव्ह? माजी वेस्ट इंडिज कर्णधाराने लांबलचक पोस्टसह अफवांवर दिले स्पष्टीकरण)
कोरोना एक सक्रिय पाऊल म्हणून केली गेली होती. साईने सर्व खेळाडूंना आगमन झाल्यावर त्वरित कोविड-19 टेस्ट करण्याचे बंधनकारक केले होते. पॉसिटीव्ह खेळाडू एकत्र प्रवास करत असल्याने, आपल्या गावाहून बेंगळुरूला जाताना व्हायरसचा संसर्ग झाल्याचा दाट संशय सध्या व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि व्हायरसचे संक्रमण होण्याची शक्यता टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणूनसर्व खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले आहे. क्वारंटाइन खेळाडूंनी शिबिरात आधीपासून उपस्थित असलेल्या इतर खेळाडूंशी संवाद साधलेला नाही.
राज्य सरकारच्या एसओपीचे SAI येथे काटेकोरपणे पालन केले जात आहे. 2021 ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडू या आठवड्याच्या सुरूवातीला बंगळुरु येथे पोहचले होते.