India Schedule In Paris Olympics 2024 On 8th August: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) स्पर्धेला 12 दिवस पूर्ण झाले असून, भारताने आतापर्यंत नेमबाजीच्या विविध स्पर्धांमध्ये केवळ 3 पदके जिंकली आहेत. 12 व्या दिवशी, सर्व भारतीय चाहत्यांना आशा होती की विनेश फोगट (Vinesh Phogat) पदक जिंकण्यात यशस्वी होईल परंतु सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. याशिवाय मीराबाई चानूने (Mirabai Chanu) वेटलिफ्टिंग स्पर्धेत चौथे स्थान पटकावले. आता पॅरिस ऑलिम्पिकच्या 13व्या दिवशी सर्वांच्या नजरा दोन इव्हेंट्सवर लागल्या आहेत ज्यात नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) भालाफेक इव्हेंटमध्ये तो पुन्हा सुवर्णपदक जिंकेल अशी अपेक्षा आहे, तर हॉकीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना स्पॅनिश संघाशी होणार आहे.
हॉकी संघाकडून कांस्यपदकाची अपेक्षा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने आपल्या कामगिरीने सर्व चाहत्यांना प्रभावित केले परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांना जर्मन संघाकडून 3-2 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीत आता त्याच्याकडून किमान कांस्यपदक तरी जिंकावे, अशी अपेक्षा सर्व चाहत्यांना आहे. भारतीय संघाचा सामना स्पेनशी होणार आहे. याशिवाय अमन सेहरावत आणि अंशू मलिक हे देखील कुस्तीमध्ये ॲक्शन करताना दिसणार आहेत. नीरज चोप्राची पदक स्पर्धा आज भारतीय वेळेनुसार रात्री 11.55 वाजता सुरू होईल.
हे देखील वाचा: Vinesh Phogat Retires: 'कुस्ती जिंकली, मी हरले आता माझ्यात ताकद नाही'; विनेश फोगाट ने भावनिक पोस्ट लिहित जाहीर केली निवृत्ती
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचे 13 व्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्टचे वेळापत्रक असे आहे
ऍथलेटिक्समध्ये महिलांची 100 मीटर हर्डल्स रिपेचेज फेरी - ज्योती याराजी - भारतीय वेळेनुसार दुपारी 2:05 वाजता
कुस्तीमधील पुरुषांच्या 57 किलो गटातील 16 ची फेरी - अमन सेहरावत विरुद्ध व्लादिमीर एगोरोव भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
कुस्तीमधील महिलांच्या 57 किलो गटातील 16 ची फेरी - अंशू मलिक विरुद्ध हेलन मारोलिस - भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
हॉकी कांस्यपदक सामना - भारत विरुद्ध स्पेन - भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता
भालाफेक पदक स्पर्धा पुरुष - नीरज चोप्रा - भारतीय वेळेनुसार रात्री 11:55 वाजता