IOC चा मोठा निर्णय, 2022 राष्ट्रकुल खेळात भारत घेणार सहभाग; 2026 किंवा 2030 च्या यजमान पदासाठी करणार बीड
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (Photo Credit: PTI)

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (Indian Olympic Assosiation) सोमवारी सांगितले की ते 2026 किंवा 2030 राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games) स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीड करेल. आयओएने (IOA) 2022 च्या बर्मिंघम (Birmingham) गेम्समधून शूटिंग हटविण्याच्या मागणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय देखील मागे घेतला आहे. देशातील ऑलिम्पिक स्पर्धेची सर्वोच्च संस्था आयओए आता राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सरकारकडे आवश्यक मंजूरी मागेल. 2010 मध्ये भारताने यापूर्वी राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले होते. कॉमनवेल्थ स्पोर्ट्स फेडरेशनच्या (सीजीएफ) च्या सल्ल्यानुसार आयओएने त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कॉमनवेल्थ गेम्स 2022 पूर्वी राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेचे आयोजन करण्याचा औपचारिक प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 च्या स्पर्धेत होणाऱ्या स्पर्धेत शूटिंगचा खेळ काढल्याची भरपाई करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय नेमबाज संघटना आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेने ही संकल्पना सुचवली आहे. (बर्मिंगहॅम 2022 Commonwealth Games मध्ये रंगणार महिला टी-20 क्रिकेटचा थरार, जाणून घ्या सविस्तर)

देशातील ऑलिम्पिक स्पर्धेची सर्वोच्च संस्था आयओए आता राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सरकारकडे आवश्यक मंजूरी मागेल. किगाली, रवांडा येथे सीजीएफ 2019 ची सर्वसाधारण सभा 2026 च्या स्पर्धेच्या यजमानपदावर निश्चित होणार होती पण ती पुढे ढकलण्यात आली आणि आता पुढील वर्षी याची घोषणा होईल. सीजीएफला नेमबाजीच्या धर्तीवर तिरंदाजीची राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याची विनंती केली जाईल असा ठराव देखील संमत केला आहे. आगामी 2022 राष्ट्रकुल खेळात तिरंदाजी देखील भाग नाही.

आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले, "आम्ही 2026 किंवा 2030 राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यासाठी बोली लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 2022 राष्ट्रकुल खेळासाठी भारतीय तुकडी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा आयोजित करण्याच्या भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या (एनआरएआय) प्रस्तावाला मान्यताही देण्यात आली आहे. हे 2022 मध्ये बर्मिंघॅम गेम्सपूर्वी आयोजित केले जाईल. या गेममधून शूटिंगचा खेळ हटवल्याची भरपाई होईल."