बर्मिंगहॅम 2022 Commonwealth Games मध्ये रंगणार महिला टी-20 क्रिकेटचा थरार, जाणून घ्या सविस्तर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि इंग्लंड अँड आणि क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) संयुक्त बोलीनंतर राष्ट्रकुल क्रीडा महासंघ, सीजीएफने आज बर्मिंघम 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या टी-20 क्रिकेटला मान्यता देण्याची जाहीर केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) संयुक्त बोलीनंतर राष्ट्रकुल क्रीडा महासंघ, सीजीएफने आज बर्मिंघम (Birmingham) 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) महिलांच्या टी-20 क्रिकेटला मान्यता देण्याची जाहीर केले आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु सावनी यांनी म्हटले, "महिलांच्या क्रिकेटसाठी आणि जागतिक क्रिकेट समुदायासाठी ही खरोखर ऐतिहासिक बाब आहे, ज्यांनी या बोलीच्या समर्थनार्थ एकता दर्शविली." "महिला क्रिकेट हे अजून बळकट होत चालले आहे, आणि आम्हाला आनंद झाला आहे आणि सन्मानित वाटत आहे की कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशनने बर्मिंघम 2022 मध्ये महिलांचे टी-20 क्रिकेट समाविष्ट करण्यासाठी मतदान केले."
२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आठ महिला संघ आठ सामने खेळतील. 1998 नंतर पहिल्यांदा क्रिकेटला पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत मान्यता मिळाली आहे. 1998 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कुआलालंपूर येथे पुरुषांच्या 50 ओव्हरच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रकुल स्पर्ध इंग्लंडमध्ये बर्मिंघम 27 जुलै ते 7ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहेत. या नियोजना साठी 845मिलियन युरोज इतका खर्च अपेक्षित आहे. यामध्ये 18 गेम्समध्ये तब्बल 4,500 खेळाडू भाग घेणार घेतील. महिला टी-20 चे हे आठही मॅच एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळवले जातील. याआधी आयसीसी पुरुषांच्या विश्वचषकात इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलमधील विजयासह अनेक यादगार सामने या मैदानावर खेळले आहेत.
Women’s T20 Cricket has been confirmed for inclusion at the Birmingham 2022 Commonwealth Games 👏 pic.twitter.com/2rTfeZ0tKn
— ICC (@ICC) August 13, 2019
दुसरीकडे, महिला क्रिकेट व्यतिरिक्त व्हॉलीबॉल आणि दिव्यांगांसाठीच्या एका क्रीडा प्रकारचा देखील राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2019 02:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

