Picture used for representational purpose (Photo Credits: Getty Images)

FIFA U-17 Women's World Cup 2020 Time Table:  कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव फिफावर पडला. फिफाने (FIFA) यंदा होणारे महिला अंडर-17 वर्ल्ड कप 2021 पर्यंत स्थगित केले आहे. फिफा अंडर-17 महिला विश्वचषक (Women's World Cup) आता पुढील वर्षी 17 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान भारतात आयोजित केले जाईल. जागतिक फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफाने मंगळवारी कोरोनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचे सखोल मूल्यांकन केल्यावर हा निर्णय घेतला. यापूर्वी यावर्षी 2 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार होती. परंतु जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मागील महिन्यात स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आणि आता त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. फिफाने जाहीर केले की या स्पर्धेचे मूळ पात्रतेचे निकष कायम आहेत आणि अशाप्रकारे, त्याने 1 जानेवारी 2003 रोजी किंवा नंतर आणि 31 डिसेंबर 2005 किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या खेळाडूंना परवानगी दिली आहे. या शिवाय, फिफाने महिला अंडर -20 वर्ल्ड कप स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोस्टा रिका आणि पनामा येथे होणार होते, पण कोविड-19 महामारीमुळे आता त्याचे जानेवारीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. (Coronavirus: फुटबॉल चाहत्यांसाठी आली गोड बातमी, जुवेंटसचा स्टार खेळाडू पाउलो डायबाला झाला कोरोना मुक्त)

20-फेब्रुवारी. 6, 2021, जागतिक प्रशासकीय संस्था फिफाने मंगळवारी सांगितले. “फिफाच्या आजच्या घोषणेनंतर एआयएफएफ आणि एलओसी फिफा अंडर-17महिला विश्वचषक भारत 2020च्या नवीन तारखांची पुष्टी झाल्याने खूश आहेत जे आता  17 फेब्रुवारी ते 7 मार्च 2021 दरम्यान होणार आहेत. युफा, कॉन्काकॅफ, सीएएफ, ओएफसी आणि कॉनबॉल पात्रता स्पर्धा तसेच फिफा अंडर -17 महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी देशातील सर्वोत्तम संभाव्य परिस्थितीचा विचार करून तारखांची पुष्टी केली गेली. आम्ही आता वाट पाहत आहोत आणि एक आश्चर्यकारक स्पर्धा होस्ट करेल अशी आशा आहे ज्यामुळे भारतातील महिलांचे फुटबॉल आणखी विकसित होईल.” फिफाच्या स्थानिक आयोजन समितीने (एलओसी) एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

30 एप्रिल 2020 रोजी फिफा कौन्सिलच्या बैठकीत अस्थायी तारखा सुचविल्या गेल्या आणि 11 मे, सोमवारी या निर्णयाला अंतिम रूप देण्यात आले. अंडर-17 महिला वर्ल्ड कपसाठी भारतातील पाच ठिकाणी - कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, अहमदाबाद आणि नवी मुंबई निश्चित केली होती.