Euro 2020: पोर्तुगाल (Portugal) संघाने करिष्माई कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) आपल्या जोरदार खेळाच्या जोरावर युरो कप (Euro Cup) 2020 च्या पहिल्या सामन्यात हंगेरीला (Hungry) 3-0 ने पराभूत केले. अर्ध्या वेळेपर्यंत दोन्ही संघ 0-0 अशा बरोबरीत होते. नंतर रोनाल्डोने संघासाठी दोन मजबूत गोल करून संघाला मोठा विजय मिळवून दिला. राफेल गुरेराने (Raphael Guerreiro) 84व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला आणि पोर्तुगालला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रोनाल्डोने पुढील पाच मिनिटांत दोन गोल केले. रोनाल्डोने स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. रोनाल्डोच्या नावावर आता युरो स्पर्धेत 11 गोल झाले आहेत. हंगेरीवरील संघाचा हा दहावा एकूण विजय आहे. 2016 मध्ये दोघांमध्ये खेळलेला सामना 3-3 असा अनिर्णित राहिला होता. (UEFA Euro 2020 Schedule in IST: युरोपमध्ये आजपासून सुरु होणार फुटबॉलचे घमासान; जाणून घ्या संपूर्ण फिक्स्चर आणि सामन्यांचे टाइम टेबल)
यापूर्वी फ्रान्सचा माइकल प्लातिनी आणि रोनाल्डो प्रत्येकी 9 गोलसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर होते. पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोची ही 5वी युरो चषक स्पर्धा आहे. स्पर्धेत अशी कमाल करणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय स्तरावर 106 गोल केले आणि आता तो माजी इराणचा स्ट्रायकर अली डेईच्या 109 आंतरराष्ट्रीय गोलच्या फक्त 3 गोलने पिछाडीवर आहे. दुसर्या हाफमध्ये हंगेरी आणि पोर्तुगाल यांच्यात चांगली टक्कर पाहायला मिळाली. रोनाल्डो, जोटा आणि ब्रुनो फर्नांडिस यांना रोखण्यात हंगेरियन बचावकर्त्यांनी उत्तम कामगिरी केली. युरो चषकाच्या अंतिम 6 सत्रात बाद फेरी गाठणारा पोर्तुगाल एकमेव संघ आहे. हंगेरीविरुद्ध खेळलेल्या 14व्या सामन्यातील पोर्तुगाल संघाने 10 जिंकले आहेत, तर 4 अनिर्णित राहिले आहेत. विशेष म्हणजे हंगेरियन संघ पोर्तुगालला आजवर कधीही हरवू शकलेला नाही.
Cristiano Ronaldo 🤩
⚽️ All-time EURO top scorer (11 goals)
🇵🇹 All-time top scorer for Portugal (106 goals)
👕 First player to appear at 5 EURO final tournaments
👏 First player to score at 5 consecutive EURO final tournaments #EURO2020 pic.twitter.com/rjJ7C5iXo1
— UEFA EURO 2020 (@EURO2020) June 15, 2021
दरम्यान, पोर्तुगालचा हंगेरीवर 3-0 ने विजय हा युरोच्या गतविजेत्या चॅम्पियन्सचा त्यांच्या पहिल्याच सामन्यात संयुक्तपणे केलेला सर्वात मोठा विजय ठरला. त्यांनी 1964 मध्ये सोव्हिएत युनियनने डेन्मार्कवर 3-0 विजयाची बरोबरी केली.