सायना नेहवाल हिने फोडले फटाके; सोशल मीडियावर चाहत्यांनी दिला  Eco-Friendly Diwali साजरी करण्याचा सल्ला; पाहा नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
सायना नेहवाल (Photo Credit: Instagram/Saina Nehwal)

[Poll ID="null" title="undefined"]मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांनी काळ सोशल मीडियाच्या माध्यमाने चाहत्यांना दिवाळीच्या (Diwali) शुभेच्छा दिल्या. दिव्याचा सण दिवाळी संपूर्ण भारतात जल्लोषात साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्व घरे दिव्यांनी चमकतात. सचिन-विराटपासून ते सानिया मिर्झा पर्यंत सर्व भारतीय खेळाडूंनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. यात देशाची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) चाही समावेश आहे. सायनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिवाळीनिमित्त एक व्हिडिओ शेअर केला. पण, तिचा हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सना फारसा काही आवडला नाही आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियांनी तो दर्शवूनही दाखवला. दुखापतीतून पुनरागमन करणारी सायनाने आपला मागील खडतर प्रवास विसरून दिवाळी साजरी केली. पण, अग्रगण्य क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती इको-फ्रेंडली दिवाळीसाठी प्रचार करत असताना नेहवालने तिचा दिवाळी फटाक्यांसह साजरा करण्याचा एक व्हिडिओ शेअर केला. (विराट कोहली-अनुष्का शर्मा, झहीर खान-सागरिका घाटगे; पहा तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंनी कशी साजरी केली Diwali)

दिवाळीच्या वेळी फटाक्यांच्या वापरावरुन वादविवाद चालू आहेत. फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो आणि तर मोकाट प्राण्यांसाठीही हे फटाके धोकादायक सिद्ध होतात. दरवर्षी भारतभरातील लोक दिव्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी फटाक्यांचा वापर करतात. अलिकडच्या काळात, प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या सेलिब्रेशनच्या पद्धतीपासून परावृत्त केले आहे किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्या उत्सवांचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर न करण्याइतके हुशार आहेत. आणि जेव्हा जेव्हा असे फोटो किंवा व्हिडिओ शेअर होतात, तेव्हा ट्रोलर्सपासून ते वाचू शकत नाही आणि त्यांच्या निशाण्यावर येतात. आणि सायनसोबत देखील असेच काहीसे झाले.

 

View this post on Instagram

 

Happy Diwali 🤩🤩

A post shared by SAINA NEHWAL (@nehwalsaina) on

पहा सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया:

सायनाव्यतिरिक्त व्हीव्हीस लक्ष्मण, सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग आणि अन्य भारतीय खेळाडूंनी दिवाळीच्याशुभेच्छा दिल्या. इतकेच नाही तर विदेशी क्रिकेटपटू-स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर आणि क्रिस गेल यांनीही सोशल मीडियावर दिवाळीनिमित्त पोस्ट शेअर केल्या.