सध्या चालू असलेल्या सीरी ए (Serie A) 2019-20 हंगामात एसी मिलानने (AC Milan) पाच मिनिटांच्या अंतरात तीन गोल नोंदवून जुव्हेंटसला (Juventus) 4-2 ने पराभूत केले. या पराभवाच्या परिणामी, सीरी ए पुन्हा सुरू झाल्यापासून जुव्हेंटसने पहिल्यांदा गुण गमवावे लागले. तथापि, चालू हंगामात क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) 30 गोल पूर्ण केले. पहिल्या हाफला कोणतेही गोल झाले नाहीत, परंतु दुसर्या हाफमध्ये सामना रोचक ठरला. पोर्तुगालच्या स्टार फुटबॉलरने खेळाच्या 53 व्या मिनिटाला गोल करून कामगिरीची नोंद केली. शिवाय, गेल्या 11 मोसमात रोनाल्डोने 30 गोल केले आहेत तेव्हाची ही 10 वी वेळ आहे. सध्याच्या हंगामात रोनाल्डोने सीरी ए मध्ये 26 गोल केले आहेत आणि कोपा इटालियातील चॅम्पियन्स लीगमध्ये 2 गोल केले आहेत. एकंदरीत, या कामगिरीची नोंद करण्यासाठी त्याने फक्त 39 गेम घेतले. 2015-16 च्या हंगामात त्याने 64 सामन्यांत 62 गोल करत त्याने त्याचा सर्वोत्कृष्ट खेळ केला होता. (Leeds United क्लबने प्रेक्षकांच्या कटआउटसोबत स्टँडमध्ये बसवला ओसामा बिन लादेन याचा कटआउट, यूजर्सच्या संतापानंतर हटवला)
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर अॅड्रियन रॅबियट आणि रोनाल्डो यांनी अनुक्रमे 47 आणि 53 व्या मिनिटाला गोल करून जुव्हेंटस 2-0 ने आघाडी मिळवून दिली. परंतु एसी मिलानने जोरदार पुनरागमन केले आणि यजमानांनी 67 व्या मिनिटाला 3-2 अशी आघाडी मिळविली. एसी मिलानच्या झलतान इब्राहिमोविचने 62 व्या मिनिटाला पेनल्टीसह एक गोल परत केला. चार मिनिटांनंतर फ्रॅंक केसीने बरोबरी साधली आणि शेवटी राफेल लिओने एसी मिलानला सामन्यात पुढे नेले.
सामन्याच्या 80 व्या मिनिटाला एसी मिलानकडून अँटे रेबिकने अंतिम गोल केला. दरम्यान, पराभवानंतरही जुव्हेंटस सध्या 31 सामन्यांमधून 75 गुणांसह सीरी एच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर एसी मिलान 49 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.