स्पेनमधील (Spain) या कठीण परिस्थितीत क्लबच्या इतर कर्मचार्यांना पूर्ण पगार मिळावा यासाठी बार्सिलोनाचे (Barcelon) खेळाडू पगाराच्या 70 टक्के कपात करून आर्थिक योगदान देतील, अशी पुष्टी सुपरस्टार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांनी सोमवारी केली. इन्स्टाग्रामवर मोठ्या मेसेजद्वारे मेस्सीने बार्सिलोना क्लबच्या बोर्डावरही टीका केली. स्पेन सध्या कोविड-19 (COVID-19) साथीच्या आजाराशी झुंज देत आहे. स्पेनमधील इतर क्लबनही तात्पुरते वेतन कमी आहे. मेस्सीने लिहिले की, “आता मोठी मदत करण्याची वेळ आली आहे. देशात सध्या उद्भवलेल्या आपात्कालीन स्थिती दरम्यान मी माझ्या मानधनात 70 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आर्थिक सहाय्य केले तरच अशा परिस्थितीत क्लबमधील कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळेल.” स्पेनमध्ये कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोनामुळे पीडित लोकांची संख्या जगभरात 7,40,235 पर्यंत वाढली आहे, तर मृतांचा आकडा 35,035 वर पोचला आहे. स्पेनमध्ये गेल्या 24 तासात 812 लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,340 वर पोहचला आहे. (कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 15 वर्षीय शूटर ईशा सिंह ची मदत, बचतीमधून PM-Cares फंडला 30 हजार रुपये केले दान)
अहवालानुसार मेस्सी त्याच्या वेतनातील एकूण 354 कोटी रुपये कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी देईल. मेस्सीने प्रदीर्घ संदेशात बार्सिलोना क्लबच्या बोर्डावरही टीका केली. त्याने लिहिले, "कधीकधी आम्ही हे स्वतःच केले आहे, जेव्हा आम्हाला वाटते की ते आवश्यक आणि महत्वाचे आहे. आम्ही नेहमीच क्लबला मदत केली आहे, जेव्हा आम्हाला विचारले जाते. म्हणूनच हे आश्चर्यकारक नाही की क्लबमधील काही लोकं आमची परीक्षा घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असताना आम्हाला हे नेहमीच माहित असते." यापूर्वी, बार्सिलोना फुटबॉल क्लबकडून खेळणाऱ्या मेस्सीने बार्सिलोनाच्या रुग्णालयाला दहा लाख युरो म्हणजेच साडे आठशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. हॉस्पिटल क्लिनिक नाव असलेला रुग्णालयाने मेस्सीने त्यांना खूप मदत केल्याची पुष्टी केली होती.
View this post on Instagram
करोनामुळे जगातील एक तृतीयांश लोकसंख्या लॉकडाउनमध्ये आहे. फक्त स्पेनबद्दल बोलायचे झाले तर 85 हजारांपेक्षा अधिक लोक संक्रमित झाले आहेत, तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 6 हजार 500 च्या वर पोहचली आहे.