कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 15 वर्षीय शूटर ईशा सिंह ची मदत, बचतीमधून PM-Cares फंडला 30 हजार रुपये केले दान
ईशा सिंह (Photo Credit: IANS)

देश सध्या एक कठीण परिस्थितीत आहे आणि आपल्याला काहीतरी करायचे असल्यास, वय महत्व ठेवत नाही. 15 वर्षाची नेमबाज ईशा सिंगनेही (Esha Singh) असेच काहीसे केले आहे. कोविड-19 शी लढण्यासाठी ईशाने पीएम-केयर्स फंडमध्ये (PM Cares Fund) देणगी देण्याचे जाहीर केलं आहे. ईशाने 30 हजार रुपये निधीला दिले. ऐशाने कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) लढा देण्यासाठी पंतप्रधानांच्या मदतनिधीला 30,000 रुपयांची देणगी देण्याचे वचन दिले आणि यासह 15 वर्षीय ईशा आर्थिक योगदान देणारी देशातील सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. ईशाने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. एशाने तिच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, “कोविडशी लढण्यासाठी पीएम केअर फंडला मी माझ्या बचतीतून 30 हजार रुपयांचे योगदान देण्याचे वचन देते.” कोविड-19 (COVID-19) ने जगभरात विनाश झाला आहे आणि आजवर जगभरात 6.5 लोकांचा मृत्यू झाल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतातही 1000 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्णांव्यतिरिक्त 25 हुन अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (Coronavirus: विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची मुख्यमंत्री आणि PM-CARES ला मदत, कोरोनाविरुद्ध लढाईसाठी केली आर्थिक मदतीची घोषणा)

क्रीडा मंत्री किरेन रिजीजूं यांनी ट्विट करून ईशाचे आभार मानले. रिजिजूंनी ट्वीट केले की, "प्रिय ईशा, आता तू 15 वर्षांची आहेस पण आपण खरी चॅम्पियन असल्याचे दाखवून दिले आहे. #PMCARES फंडमध्ये अशा उदार योगदानाचे कौतुक केले जाते."

यापूर्वी क्रिकेटपटू सुरेश रैनाने कोविड-19 विरूद्ध लढण्यासाठी पीएम केअर फंडमध्ये 21 लाख आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री फंडमध्ये 21 लाख दिले. प्रभावशाली भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) महामारीविरूद्ध लढ्यात 51 कोटी रुपयांचा हातभार लावला आणि काही संलग्न संघटनांनीही यात प्रवेश केला. आदल्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 16-वर्षीय भारतीय महिला संघाची क्रिकेटर रिचा घोषने 1 लाख रुपयांचे योगदान दिले. कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी विविध खेळाडू देशाला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. यात धावपटू हिमा दास, कुस्तीपटू बजरंग पुनिया, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू यांनी पुढाकार घेतला आहे.