Coronavirus: 'माझी सगळी पदकं तुमची', ऑलिम्पिक 'गोल्डन गर्ल' कॅरोलिना मारिनचा करोनाशी सामना करणाऱ्या योद्धांना सलाम
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मारिन (Photo Credit: Getty)

सामान्य लोकांना घरीच राहण्यास सांगितले जात असताना, जगभरातील वैद्यकीय व्यावसायिक कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लढा देणारे खरे योद्धा आहेत. डॉक्टर आणि इतर सर्व आरोग्य व्यावसायिकांनी त्यांच्या अथक सेवेमुळे लाखो लोकांची मने जिंकली आहेत. अशा योद्धांना सलाम करत संकटात सर्वात जास्त प्रभावित झालेल्या देशांपैकी एक स्पेनला (Spain) ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती बॅडमिंटनपटू कॅरोलिना मारिनची (Carolina Marin) साथ मिळाली जिने वैद्यकीय व्यावसायिकांना पदक देण्याची इच्छा व्यक्त केली. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये (Rio Olympics) भारताच्या पीव्ही सिंधूला (PV Sindhu) महिला एकेरी फायनल स्पर्धेत पराभूत करून सुवर्णपदक जिंकणाऱ्या मारिनने व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून माद्रिदमधील Virgen del Mar हॉस्पिटलच्या फ्रंटलाइन काम करणाऱ्यांना आश्चर्यचकित केले. या संकटाच्या वेळी आरोग्य व्यावसायिकांचे त्यांच्या सेवेबद्दल कौतुक करून, मरिनने आपली पदकं देण्यास दर्शवली. (Coronavirus: ईडन गार्डन कर्मचारी कोरोना व्हायरस पॉसिटीव्ह आढळल्याने CAB मुख्यालय सात दिवस बंद)

“तुमच्यापुढे मी कोणीही नाही, माझी सगळी पदकं तुम्हाला द्यायला तयार आहे”, अशा शब्दांत कॅरोलिनाने सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचं कौतुक केलं. जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होते तेव्हा मी त्यांना माझे सर्व पदके ऑफर केली कारण खरं तर ते स्पेनमधील खरे नायक आहेत. ते प्रत्येक कौतुकास पात्र ठरतात.” मरिनने इंडियन एक्सप्रेसला सांगितले. बार्सिलोना येथील Sanitas Cima रुग्णालयातही मारिनने वेळ काढून कर्मचार्‍यांशी संवाद साधला. या रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी 100 वर्षांच्या वृद्ध इसमाला व्हायरसपासून यशस्वीरित्या रिकव्हर होण्यास मदत केली.

इंडियन एक्स्प्रेसने पाठवलेल्या इ-मेलला मरिनने प्रतिक्रिया देत म्हटलं, “मी गेले काही दिवस स्पेनमधील हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांशी बोलतेय. सध्याच्या खडतर काळात ते ज्या पद्धतीने रुग्णांची सेवा आणि काळजी घेत आहेत यासाठी त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास खरंच वाखणण्याजोगा आहे. प्रत्येक जण आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची काळजी घेतोय, यासाठी मला त्यांचे आभार मानायचे होते.” कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत स्पेन या विषाणूचे एक केंद्र म्हणून उदयास आले परंतु त्यांनी लॉकडाऊनमध्ये सरकारने दिलेल्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून रोगाचा प्रसार नियंत्रित केला.