ला लीगा (Photo Credit: Getty)

बार्सिलोना सोमवारी गटात परत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ला लीगाने (La Liga) आपल्या क्लबला सोमवारपासून 10 खेळाडूंच्या गटात प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली. यासह, पुढच्या महिन्यात फुटबॉलचा हंगाम पुन्हा सुरू करण्याच्या संभाव्य योजनेच्या दिशेने संघांनी आणखी एक पाऊल टाकले. स्पॅनिश (Spain) सरकारने असे नियम जाहीर केले जे सर्व क्लबना प्रशिक्षण सत्र वाढवू देतात. कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध आहेत अशा ठिकाणच्या क्लबलाही ही मंजुरी मिळाली आहे. याचा अर्थ असा की रिअल माद्रिद (Madrid), बार्सिलोना (Barcelona) आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद सारख्या संघ 10 खेळाडूंच्या गटात प्रशिक्षण घेण्यास सक्षम आहे. माद्रिद आणि कॅटालोनिया हे दोघेही 'फेज शून्य' वर आहेत आणि स्पेनमधील कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित झालेले दोन भाग आहेत. आतापर्यंत जगभरात 48 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर या विषाणूमुळे 3 लाखाहून अधिक मृत्यू ची नोंद झाली आहे. (संतापजनक! COVID-19 झाल्याच्या संशयातून फुटबॉलपटूकडून स्वतःच्या 5 वर्षाच्या मुलाची हत्या)

रविवारी ला लीगाचे अध्यक्ष जेवियर टेबस (Javier Tebas) म्हणाले, “हा निर्णय मंत्रालयाचा आहे. सर्व संघांनी त्याच पद्धतीने प्रशिक्षण देणे फार महत्वाचे आहे.'' एस्पनीओल, लेगनेस, गेटाफ आणि रियल वॅलाडोलिड यांनाही मोठ्या गटात प्रशिक्षण घेण्यास विशेष मान्यता मिळाली आहे. ला लीगा फुटबॉल लीगचे अध्यक्ष जेव्हियर टेबास यांनी सामन्यांना पुन्हा सुरुवात करण्यासाठी 12 जून ही आदर्श तारीख ठरविली आहे. जर्मनीची फुटबॉल लीग बुंडीशलिगा 16 मे रोजी सुरू झाली आहे. दोन महिन्यांच्या अंतरानंतर युरोपमध्ये सुरु होणारी ही पहिल्या लीग आहे. कोरोना व्हायरसमुळे ही लीग बंद करण्यात आली होती. जर ही लीग यशस्वी झाली तर ला लीगा आणि सेरी ए सारख्या स्पर्धा देखील सुरू केल्या जाऊ शकतात.

दरम्यान, अमेरीकामध्ये या या विषाणूचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत 213 देशांमध्ये 82,247 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आणि मृतांची संख्या वाढून 3,617 झाली आहे. दुसरीकडे, स्पेनने लॉकडाउन हटवण्यास सुरवात केल्याने खेळाडूंना 4 मे पासून वैयक्तिक काम पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. स्पेनमधील इतर अनेक भागात लॉकडाउन सुलभ होत आहे. शनिवारी कोविड-19 मृतांचा आकडा घसरून 102 वर पोहचला.