प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Getty)

माजी भारतीय हॉकीपटू अशोक दिवाण, (Ashok Deewan) जे कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटात अमेरिकेत अस्वस्थ आणि अडकलेले आहे त्यांना त्वरित वैद्यकीय मदत मिळेल, अशी ग्वाही सरकारने दिली आहे. दीवान यांना तब्येतीची समस्या उद्भवल्यानंतर त्यांनी क्रीडा मंत्रालयाची मदत घेतली होती. 20 एप्रिल रोजी तो भारतात परतणार होते, पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळे त्यांचा प्रवास पुढे ढकलण्यात आला. "हॉकी ऑलिम्पियन अशोक दिवाण अमेरिकेत अडकले आहे आणि ते आजारी आहेत. त्यांनी आयओएमार्फत किरेन रीजीजूकडे संपर्क साधला, "किरेन रिजिजू (Kiren Rijiju) कार्यालयाने गुरुवारी ट्विट केले. वेगवेगळ्या देशांमध्ये कोविड-19 लॉकडाऊनमुळे बरीच लोकं परदेशात अडकले आहेत. दिवान यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्याकडे मदतीची विनंती करत पात्र लिहिले होते.

"सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी श्री दिवान यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर पाठवित आहेत. @WEAreTeamIndia,” त्यांनी ट्विटमध्ये पुढे नमूद केले आहे. दिवान यांनी बत्रा यांना एक पत्र लिहिले, "मला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला माहिती आहे की मी अमेरिकेत अडकला आहे आणि माझे तब्येत ठीक नाही. बीपीच्या समस्येमुळे मला गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माझे परतीचे तिकीट पुढे ढकलले गेले आहे. माझ्याकडे येथे कोणताही विमा नाही ज्यामुळे खर्च महाग झाला आहे. मला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत करण्यासाठी क्रीडामंत्री किरण रिजिजू आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाशी बोलण्याचे आवाहन करतो."

दिवान, हे भारताच्या 1976 ऑलिम्पिक हॉकी टीमचे सदस्य होते. 13 मार्च 1975 रोजी भारताने जिंकलेल्या पहिल्या हॉकी विश्वचषक संघाचे दिवान सदस्य होते. दिवान यांना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, 1975 च्या विश्वचषक विजेत्या संघाच्या नायक दिवानने भारतात परतल्यानंतर सर्व बिल देण्याचे आश्वासनही दिले आहे.