टेनिस | प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

जुलैच्या सुरुवातीपासूनच ब्रिटनमध्ये (England) व्यावसायिक टेनिस स्पर्धेची मालिका रंगणार आहे. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाउननंतर (Lockdown) देशात खेळ पुन्हा सुरु करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉन टेनिस असोसिएशनने म्हटले आहे की 3 ते 26 जुलै दरम्यान चार ब्रिटीश टूर इव्हेंट (British Tour Events) आयोजित करण्यात येतील. एलटीएचे (LTA) मुख्य कार्यकारी स्कॉट लॉयड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "कोरोना व्हायरसच्या संकट सुरु झाल्यापासून आम्ही सर्व खेळाडू, स्थळे, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांना आधार देण्यासाठी अविश्वसनीय परिश्रम घेत आहोत. सरकारसह युके स्पोर्टने समन्वयित केलेल्या 5-चरणांच्या योजनेचा भाग म्हणून बंद दारामागे सुरक्षितपणे स्पर्धा करण्यासाठी एलिट टेनिसच्या पुनरागमन करण्याचं जाहीर करताना आज मला आनंद होत आहे." कडक आरोग्य प्रोटोकॉल अंतर्गत क्लब उघडण्यास परवानगी असलेल्या क्लबसह मनोरंजक टेनिस आधीच सुरू झाले आहे. (Coronavirus: कोरोना व्हायरसचा केंद्रबिंदू असलेल्या वुहानमध्ये परतला फुटबॉल, तीन महिन्याच्या लॉकडाउननंतर सरावासाठी खेळाडू मैदानावर)

ब्रिटिश टूर इव्हेंट्स रोहॅम्प्टन येथील एलटीएच्या नॅशनल टेनिस सेंटर येथे तीन दिवसांपर्यंत आयोजित केले जातील. प्रत्येक स्पर्धेमध्ये 32 एकेरी खेळाडू (16 पुरुष आणि 16 महिला) भाग घेतील. मार्चपासून कोणतीही व्यावसायिक स्पर्धा खेळली गेली नाही. फ्रेंच ओपन वर्षाच्या उत्तरार्धात हलविण्यात आले आहे, तर विम्बल्डन यंदा रद्द करण्यात आले आहे. एटीपी, डब्ल्यूटीए आणि आयटीएफ टूर्स ऑगस्टपर्यंत होल्डवर राहतील.

लॉन टेनिस असोसिएशनतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी घरगुती खेळाडूंसाठी सुमारे सहा किंवा सात स्पर्धांची मालिका येत्या 24 तासांत जाहीर होणार आहे. यातइंग्लंडचे प्रसिद्ध टेनिस खेळाडू अँडी मरे, जेमी मरे, काइल एडमंड, जोहाना कोंटा यांचा सहभाग घेतील. दरम्यान, ब्रिटनच्या सरकारने यापूर्वी देशातील लॉकडाउन नियमांमध्ये काही प्रमाणात बदल केला आहे. ज्यानुसार खेळाडूंना मैदानात येऊन सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांनी यापूर्वी सरावाला सुरूवात केली आहे.