Paris Olympics 2024 Medal Tally Updated: पॅरिस ऑलिम्पिक 2020 (Paris Olympics 2024) सुरू झाले आहे. यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे एकूण 117 खेळाडू दिसणार आहेत. तर 140 सपोर्ट स्टाफसह क्रीडा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सहाय्यक कर्मचाऱ्यांचे 72 सदस्य शासकीय खर्चाने मंजूर करण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू झाले, जे 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.  काल भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घालत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले आहे.  तसेच भारताने गुरुवारी स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले आणि यासह श्रीजेशने हॉकीला अलविदा केला. श्रीजेश दीर्घ काळापासून भारतीय हॉकी संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.

(हे देखील वाचा: Paris Olympics 2024: फक्त एक पदक असूनही पाकिस्तान पदकतालिकेत भारतापेक्षा वरच्या स्थानावर कसा? घ्या जाणून)

 

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मेडल टॅली अपडेट

पॅरिस ऑलिम्पिक 2024 पदकतालिकेत अमेरिका  आघाडीवर आहे, त्यांची एकूण पदकतालिका 103 आहे (30 सुवर्ण, 38 रौप्य आणि 35 कांस्य). चीन एकूण 73 पदकांसह (29 सुवर्ण, 25 रौप्य आणि 19 कांस्य) दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने आतापर्यंत  5 पदके जिंकली आहेत. यातील तीन पदके नेमबाजीतील कांस्यपदके आहेत. तर एक हाकीमधील कास्यंपदक आणि निरज चोप्राचे रजत पदक असे पाच पदक आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुमारे 11,000 खेळाडू दिसणार आहेत. 631 खेळाडू युनायटेड स्टेट्सचे प्रतिनिधित्व करत आहे, हे कोणत्याही देशापेक्षा जास्त. यजमान फ्रान्ससाठी 588 खेळाडू स्पर्धा करतील, तर 471 खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी स्पर्धा करतील.

25 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 117 खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भारतीय तुकडीमध्ये 16 क्रीडा शाखेतील 70 पुरुष आणि 47 महिला खेळाडूंचा समावेश आहे. टेबल टेनिस दिग्गज अचंता शरथ कमल आणि बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे ध्वजवाहक होते.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या संपूर्ण पदकतालिकेसाठी येथे क्लिक करा