भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) रौप्यपदकाला  (Silver Medal) गवसणी घालत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील (Olympic 2024) पाचवे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या (Javelin Throw) अंतिम फेरीत 89.45 थ्रो करत रौप्य पदक मिळवले. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे.  तर अर्शद नदीमने () 92.97 मीटरसह ऑलिम्पिक विक्रम केला. या सामन्यात ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटर थ्रोसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. पाकिस्तानला या ऑलिम्पिकमध्ये मिळाले हे पहिले पदक असून अर्शद नदीमने (Arshad Nadeem) पाकिस्तान साठी सुवर्णपदक पटकावले आहे.  (हेही वाचा - Neeraj Chopra Wins Silver: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने जिकलं रौप्यपदक)

अर्शद नदिमने 1992 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानसाठी ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त केले आहे. अर्शदने भारताचा गोल्डन बॉय निरज चोप्राचा पराभव करत हे सुवर्णपदक प्राप्त केले. या सुवर्णपदकाच्या नंतर पाकिस्तानने पदकतालिकेत मोठी झेप घेतली असून तो 53 नंबर आहे. तर भारत 1 रजत आणि 4 कास्यपदकांच्या जोरावर 63 क्रमांकावर आहे. भारताच्या पदकाची संख्या जास्त असून देखील फक्त एका पदकाच्या जोरावर पाकिस्तान भारतापेक्षा 10 क्रमांकानी पुढे आहे.   या मागे ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला प्रथम प्राधान्य दिले जाते हे कारण आहे.

ऑलिम्पिक पदक सारणीतील क्रमवारी खालीलप्रमाणे आहे:

1. सुवर्णपदकांची संख्या: ज्या देशांनी सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते.

2. रौप्य पदकांची संख्या: जर दोन देशांच्या सुवर्णपदकांची संख्या समान असेल, तर रौप्य पदकांची संख्या मानली जाते.

3. कांस्य पदकांची संख्या: जर सुवर्ण आणि रौप्य पदकांची संख्या समान असेल, तर कांस्य पदकांची संख्या आधार म्हणून घेतली जाते.

भारताकडे अजून तीन दिवस शिल्लक आहेत ज्यात ते सुवर्णपदक जिंकून पदकतालिकेत पाकिस्तानला मागे टाकू शकतात. भारताने सुवर्ण जिंकल्यास ते केवळ पाकिस्तानला मागे टाकणार नाहीत तर पदकतालिकेत 39व्या स्थानावर पोहोचतील.