
भारताची सर्वोत्कृष्ट महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) हिने जपानी खेळाडू नोजोमी ओकुहारा हिला बॅडमिंटनच्या स्पर्धेत मात दिली आहे. तर इंडोनेशियाच्या ओपन टुर्नामेंटमधील सेमीफायनमध्ये सिंधू हिला खेळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. आज झालेल्या महिला एकलच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यावेळी वर्ल्ड क्रमांक-2 आणि तिसऱ्या क्रमांकावरील जपानची नोजोमी ओकुहारा हिला 21-14, 21-7 अशा फरकाने हरविले आहे.
सिंधु हिने 44 मिनिटामध्ये सामन्यात विजय मिळवत ओकुहारा हिचा पराभव करत 8-7 असा करिअर रेकॉर्ड केला आहे. सेमीफायनलमध्ये सिंधू हिचा सामना चीन मधील यु फेई हिच्यासोबत होणार आहे. वर्ल्ड क्रमांक-3 फेई हिच्याविरुद्ध सिंधु हिने 4-3 असा विक्रम केला आहे.(Aero India 2019: बंगळुरु येथील Air Show मध्ये बँडमिंटनपटू 'पी.व्ही. सिंधू'चे तेजस विमानातून उड्डाण (Photos)
तर पुरुष एकल वर्गात वर्ल्ड क्रमांक- 9 किदाम्बी श्रीकांत याने जपानच्या केंटा निशिमोटो याला माकच्या दुसऱ्या दौऱ्यात प्रवेश केला आहे. श्रीकांत याने 38 मिनिटाच्या सामन्यात 21-14,21-13 अशा फरकाने विजय मिळवला आहे.