Australian Open 2020: रोहन बोपण्णा मिश्र दुहेरी क्वार्टर फाइनलमध्ये पराभूत; गार्बिन मुगुरुजा, सोफिया केनिनमध्ये रंगणार महिला एकेरीचा अंतिम सामना
सोफिया केनिन, गार्बिन मुगुरुजा (Photo Credit: Facebook)

ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) आणि त्याची जोडीदार युक्रेनची नादिया किचनोक (Nadiia Kichenok) यांना पराभव पत्करावा लागला आहे.  झेक प्रजासत्ताकाच्या बारबोरा क्रेजीकोवा आणि क्रोएशियाच्या निकोला मेक्टीझने त्याला 6-0, 6-2 ने सलग दोन सेटमध्ये सहज पराभूत केले. रोहन आणि नादियाला सामन्यात अजिबात टक्कर देता आली नाही आणि त्यांना 47 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. क्रोएशिया आणि झेक प्रजासत्ताकच्या जोडीने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आणि एकही गेम न गमावता पहिला सेट जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये बोपण्णा आणि किचनोकने पहिल्या गेममध्ये आपली सर्व्हिस वाचवली पण त्यानंतर या जोडीने दोनदा सर्व्हिस गमावली, परिणामी मेकटिच आणि बारबोराच्या जोडीने उपांत्य फेरी गाठली. बोपण्णाच्या या पराभवासह ऑस्ट्रेलियन ओपनमधील भारताचे आव्हान आता संपुष्टात आले आहे. लिअँडर पेस यापूर्वीच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडला आहे तर सानिया मिर्झा देखील दुखापतीमुळे बाहेर पडली होती. (Australian Open 2020: वर्ल्ड नंबर 1 एश्ले बार्टी ला ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये पराभूत करत 21 वर्षीय सोफिया केनिनची फायनलमध्ये धडक)

दुसरीकडे, महिला एकेरीच्या सेमीफायनल फेरीत सोफिया केनिन (Sofia Kenin), अमेरिकेच्या या 21 वर्षीय मुलीने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील एशले बार्टी (Ashleigh Barty) विरुद्ध 7-6, 7-5 असा झुंजार विजय मिळवला, तर दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात जागतिक क्रमवारीत 32 व्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या गार्बिन मुगुरुझा (Garbiñe Muguruza) ने जागतिक क्रमवारीत माजी अव्वल क्रमांकाची खेळाडू सिमोना हलेपचा 7-6, 7-5 असा पराभव केला. सिमोनाला मुगुरुझाने 2 तास 5 मिनिटांत पराभूत केले. दोघांनीही पहिल्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठली आहे. या दोघांमधील सामना 1 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.

जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानी असलेल्या केनिनची कोणत्याही ग्रँड स्लॅमची अंतिम फेरी गाठायची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत केनिनने ट्युनिशियाच्या ओन्स जबेउरचा पराभव केला. याआधीच्या सामन्यात केनिनने 15 वर्षीय अमेरिकन कोको गौफचा पराभव केला होता.