सोफिया केनिन (Photo Credit: IANS)

ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या सोफिया कॅनिन (Sofia Kenin) ने ऑस्ट्रेलियाच्या एश्ले बार्टीचा (Ashleigh Barty) पराभव केला. सोफियाने बर्ट्टीचा 7-6, 7-5 असा पराभव केला. घरच्या ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरी उपांत्य फेरीत खेळणार्‍या बार्टीला अमेरिकेच्या सोफियाकडून पराभव पत्करावा लागला आणि पहिल्यांदा अंतिम सामना खेळण्यापासून चुकली. सोफिया 2008 पासून ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) फायनल खेळणारी सर्वात युवा खेळाडू ठरली.  बार्टीच्या पराभवामुळे स्थानिक चाहते निराश झाले होते, ज्यांना आशा होती की 42-वर्षानंतर एखादा ऑस्ट्रेलियन खेळाडू जेतेपद जिंकेल. मात्र सोफियाने बर्ट्टीला सरळ सेटमध्ये पराभूत करून अंतिम फेरीत जाण्याचे तिचे स्वप्न मोडले. ऑस्ट्रेलियन ओपनमधील जगातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू बर्टीची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. पहिल्या सेटमध्ये दोघांमध्ये टायब्रेकरपर्यंत कडक सामना झाला. सोफियाने टायब्रेकर जिंकून पहिला सेट 7-6 असा जिंकला असला तरी दुसर्‍या सेटमध्येही केनिनने स्वत:वर दडपण राहू दिले नाही. चार मॅच पॉईंट वाचवून तिने सेट टाय ब्रेककडे नेला आणि अखेर सामना जिंकला. (Australian Open 2020: लिएंडर पेस ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर, थरारक क्वार्टर-फायनल सामना जिंकत रोजर फेडरर याची सेमीफायनलमध्ये एंट्री)

यासह सोफीयाने अमेरिकेचे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. महिला विभागात अनुभवी सेरेना विल्यम्स, व्हिनस विल्यम्स आणि 15 वर्षीय कोको गौफ स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. अंतिम सामन्यात आता सोफिया केनिनचा सामना गार्बिन मुगुरुजा आणि माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी राहिलेली सिमोना हलेप यांच्यातील दुसर्‍या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी होईल.

याशिवाय, पुरुष एकेरीतील पहिला सेमीफायनल सामना आज रोजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांच्यात खेळला जाईल. या दोघांमध्ये आजवर 49 सामने खेळले गेले आहेत, सर्बियाच्या खेळाडूने 26 तर स्वित्झर्लंडच्या फेडररने 23 सामने जिंकले आहेत. 50 व्या वेळी दोघे आमने-सामने असतील अशा परिस्थितीत पुन्हा एकदा दोन्ही दिग्गजांमध्ये उपांत्य फेरीत काटेरी झुंज पाहायला मिळू शकते.