आसाममध्ये ऑल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) या कंपनीच्या तेलाच्या विहीराला आग लागली होती. दोन आठवड्यांपासून येथील विहिरीतून गॅस गळती (Gas Leak) होत होती, ज्यामुळे मंगळवारी भयंकर आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल टीम घटनास्थळी पोहचली. या आगीमुळे नजीकच्या परिसराचे प्रचंड नुकसान झाले. या आगीत आसाम राज्य फुटबॉल संघाचे (Assam State Football) माजी गोलकिपर दुर्लोव गोगोई (Durlov Gogoi) याला जीव गमवावा लागला. आग विझवण्यासाठी तो पुढे सरसावला होता. पण ही आग एवढी भयंकर होती की, त्याला आपला जीव गमवावा लागला. ठार झालेल्या दोन अग्निशमन दलांपैकी गोगोई एक होते. बुधवारी गोगोई आणि त्यांचे सहकारी ओआयएल अग्निशामक तिकेश्वर गोहाईन यांचे मृतदेह सापडले. आगीमुळे आसपासची जंगलं, घरं आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, यामुळे संतप्त स्थानिक लोकांनी ओआयएल कर्मचार्यांवर हल्ला केला ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्नाम झाले आहे.
गोगोई यांनी अनेक वर्ष आसाम फुटबॉल संघाचे नेतृत्व केले. तसेच OL's फुटबॉल क्लबकडून तो 2003 ते 2012 या कालावधीत तो खेळला. इंडियन सुपर लीग नॉर्थ-ईस्ट युनायटेड या क्लबने गोगोईच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली. त्यांनी ट्विटद्वारे म्हटले, "आसाम संघाचा माजी गोलकीपर दुर्लोव गोगोईला अग्नीत प्राण गमवावे लागले. बचावकार्य करताना त्याची प्राणज्योत विझली. ऑइल इंडिया लिमिटेडसाठी तो फायर फायटर म्हणून कार्य करायचा. त्याच्या आत्म्याला शांती लाभो."
Former Assam State Team Goalkeeper Durlov Gogoi, passed away trying to contain the situation on ground. The ex-footballer served as a firefighter for Oil India Ltd. May his soul rest in peace and his family find the strength to deal with the incredible loss. 🙏🏻 pic.twitter.com/AhK2VbA8GO
— NorthEast United FC (@NEUtdFC) June 10, 2020
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी अपघाताबाबत बोलले आणि केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्यास सुमारे चार आठवडे लागू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात असून आजूबाजूचा परिसर रिकामा झाला आहे. ऑइल इंडिया लिमिटेड, ओएनजीसी, भारतीय वायु सेना आणि जिल्हा प्रशासनाच्या अग्निशमन दलाला भीषण आग विझविण्यासाठी खाली उतरावे लागले आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे.