Asian Champions Trophy Final Live Streaming: भारतीय महिला हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना चीनशी होणार आहे. चीनचा पराभव करताच भारतीय संघ विजेतेपद पटकावणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांची फायनल जिंकण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याआधी जाणून घ्या हा विजेतेपद सामना कधी, कुठे आणि कसा पाहू शकाल. (हे देखील वाचा: Pro Kabaddi League 2024 Live Streaming Free Online: तमिळ थलैवास आणि पुणेरी पलटणमध्ये रंगला सामना; टीव्ही चॅनल टेलिकास्टवर कसा पहाल सामना? जाणून घ्या)
कधी होणार सामना ?
भारत आणि चीनच्या महिला संघांमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा सामना आज, बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:45 वाजता सामना सुरू होईल. तसेच हा सामना बिहारमधील राजगीर स्टेडियमवर होणार आहे.
The Moment of reckoning is here! It is Bihar #Women'sAsianChampionsTrophy FINAL day 💪🥹
Cheer for #TeamIndia as they take on China in the #BiharWACT2024 Final, LIVE on #SonyLIV 📲 pic.twitter.com/oDy3E0uFaq
— Sony LIV (@SonyLIV) November 20, 2024
कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग?
भारत आणि चीन यांच्यातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण सिनो स्पोर्ट्सच्या माध्यमातून भारतात होणार आहे. तसेच ओटीटीवर सोनी लाइव्ह ॲपद्वारे भारतात लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
भारत विरुद्ध चीन हेड टू हेड
भारत आणि चीनच्या महिला संघांमध्ये आतापर्यंत 46 सामने झाले आहेत. भारताने 12 सामने जिंकले आहेत तर चीनने 28 सामने जिंकले आहेत. या दोघांमध्ये एकूण 6 सामने अनिर्णित राहिले आहेत.
गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. फायनलमध्ये पोहोचेपर्यंत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. पाचही सामने जिंकून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत जपानविरुद्ध 3-0 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. याआधी ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने एकूण 26 गोल केले होते, तर त्यांच्याविरुद्ध फक्त 2 गोल झाले होते.