Olympian runs over son accidentally (Photo Credits: Pexels)

ऑस्ट्रेलियाचा (Australia) प्रसिद्ध धावपटू आयझॅक तिमोहा ( Isaac Ntiamoah) याच्या एक वर्षाच्या बाळाचा नेमक्या पहिल्या वाढदिवशीच मृत्यू झाल्याचे समजत आहे. दुर्दैव म्हणजे आयझॅक याच्या कारखाली अनावधानाने चिरडल्याने हा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी (Sydney) येथे राहणारा आयझॅकच्या घराबाहेरच ही घटना घडली. आयझॅक हा रिले संघातून 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक (London Olympic)  मध्ये सहभागी झाला होता, तर त्याआधी राष्ट्रकुल स्पर्धेत तो चौथ्या स्थानी आला होता. पुणे: वार्डबॉयने डॉक्टर सांगून केला गर्भवती महिलेवर उपचार, नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू

आयझॅक याच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिमोहा परिवारात आनंदाचे वातावरण होते, याच आनंदात वाढदिवसाची तयारी करण्यासाठी सामान आणायला आयझॅक आपल्या घराबाहेरील पार्किंग मधील कार काढत होता. यावेळी त्याचा एका वर्षाचा चिमुकला जोसिया पार्किंग मध्ये खेळत होता. गाडी मागे घेत असताना अनावधानाने आयझॅकच्या कारखाली येऊन जोसिया चिरडला गेला. हा सर्व प्रकार, आयझॅकची पत्नी अँजोलिना हिच्या डोळयांदेखत घडला पण हे सर्व इतक्या वेगाने झाले की तिने काही हालचाल करण्याच्या आधी त्यांचे बाळ गाडीखाली आले होते. यानंतर दोघांनी तातडीने जोसियाला जवळच्या लिव्हरपूल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या सर्व प्रसंगाने आयझॅक व त्याची पत्नी अँजोलिना यांच्यावर इतका मानसिक आघात झाला की त्यांना पोलिसांना या घटनेची माहिती देणे सुद्धा शक्य झाले नाही. झाल्याप्रकरणाची माहिती त्यांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांना दिली. ज्यांनंतर पोलिसांनी त्याची गाडे ताब्यात घेतली आहे.