पुणे (Pune) येथील वडगाव शेरी भागात स्थित एका खासगी रुग्णालयातील वॉर्डबॉयने आपण डॉक्टर असल्याचे खोटे सांगून गर्भवती महिलेवर उपचार केल्याची बाब सध्या समोर आली होती, या महिलेला उपचारादरम्यान अतिस्त्राव झाल्याने तिला तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले तिथं गेल्यावर तिच्यावर योग्य उपचार करून महिलेची प्रसूती करण्यात आली, मात्र या घटनेत बाळाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि अवघ्या तीन दिवसातच बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चंदननगर पोलिस (Chandan Nagar Police) ठाण्यात संबंधित वार्डबॉय हरी शंकर ठाकूर (Hari Shankar Thakur) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारमध्ये गरम पाण्यात पडून दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
नेमकं घडलं काय?
महिलेच्या पतीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, या दांपत्याचा 2011 मध्ये विवाह झाला होता. तेव्हा पासून त्यांना मूलबाळ होत नव्हते. आठ वर्षांनंतर पत्नी गरोदर राहिल्याने सुरवातीपासून तिची विशेष काळजी घेण्यात आली होती. ही महिला एका खासगी कंपनीत नोकरी करते, मागील महिन्यात अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले, त्यावेळी तिथल्या ठाकूर नामक वार्डबॉयने आपणच डॉक्टर असल्याचे सांगून महिलेवर उपचार करण्याची तयारी दर्शवली, ठाकूर याचे परिधान सुद्धा डॉक्टर सारखेच असल्याने त्याच्यावर संशयही आला नाही. मात्र उपचार सुरु होताच एकाएकी महिलेला प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करून दोन चिमुकल्यांना दिले जीवनदान
दरम्यान, चंदननगर पोलीस हे याप्रकरणी तपास करत असून आरोपी हरी शंकर ठाकूर याच्या चुकीमुळे बालकाचा जीव गेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे, तपासानंतर आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी या दांपत्याची मागणी आहे.