प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

विरारमध्ये (Virar) एक अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या एक दीड वर्षाच्या चिमुरडीचा गरम पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवनी सोनवणे असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेने संपुर्ण सोनावणे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

विरारमधील कोपरी भागात ही घटना घडली आहे. तिला आंघोळीसाठी गरम पाणी ठेवण्यात आले होते. अवनीची आई कचरा टाकण्यासाठी घराबाहेर गेली होती. यावेळी घरात अवनी आणि तिच्या आईशिवाय दुसरे कोणीही नव्हते. यानंतर अवनीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पालकांच्या दुर्लक्षामुळे अशा घटना दररोज घडत आहे. औरंगाबादमध्येही अशीच एक घटना घडली आहे. ३ वर्षाचा मुलगा गरम भाजीवर पडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

हेही वाचा- उत्तर प्रदेश: बुलंदशहर येथे मोबाईल चार्जरचा शॉक लागून अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू

या घटनांवरुन पालकांचे आपल्या मुलांकडे बारीक लक्ष असणे खूप गरजेचे आहे. कारण आजची पिढी ही जुन्या पिढीसारखी शांत राहिली नसून ती खूपच सक्रिय आणि सर्व गोष्टी पटकन आत्मसात करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. त्यामुळे पालकांचा थोडासा ही दुर्लक्षपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो.