भारताचा उपकर्णधार आणि सलामी फलंदाज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma), टेबल-टेनिस चॅम्पियन मनिका बत्रा (Manika Batra), कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat), हॉकी महिला टीमची कर्णधार राणी रामपाल (Rani Rampal) आणि पैरालिंपिक स्वर्ण पदक विजेता मरियप्पन थंगावेलु (Mariyappan Thangavelu) यांना भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान - राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2016 नंतर प्रथमच या पुरस्कारासाठी 4 खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. रिओ ऑलिम्पिक पदकविजेते पीव्ही सिंधू, दिपा कर्माकर आणि साक्षी मलिकसह नेमबाज जीतू राय यांना 2016 मध्ये एकत्रितपणे हा पुरस्कार देण्यात आला होता. दरम्यान, हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा रोहित चौथा भारतीय क्रिकेटर ठरला, तर मनिका पहिली टेबल-टेनिस खेळाडू आहे. रोहितपूर्वी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. 1998 मध्ये खेल रत्न पुरस्काराने सन्मानित झालेला सचिनचा पहिला क्रिकेटपटू होता. त्यानंतर एमएस धोनी आणि विराट कोहली यांना हा सन्मान मिळाला आहे. (National Sports Awards 2020 Prize Money: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता; ‘खेलरत्न’साठी 25 लाख तर ‘अर्जुन’साठी 15 लाखांचे बक्षीस अपेक्षित)
2007 मध्ये टी-20 विश्वचषकात भारताचे यशस्वी नेतृत्व केल्यावर धोनीला क्रीडा सन्मान मिळाला तर विराटने 2018 मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूसमवेत हा पुरस्कार जिंकला होता. विनेश फोगट 2018 मध्ये आशियाई खेळांचे सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली. दुसरीकडे, क्रिकेटपटू इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि दीप्ती शर्मा (Deepti Sharma) अॅथलीट दुती चंद,नेमबाज मनु भाकर (Manu Bhaker) यांना 27 खेळाडूंसह अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येईल. या यादीत महिला हॉकी संघाची खेळाडू दीपिका ठाकूर, क्रिकेटर दीपक हुड्डा, आणि टेनिट खेळाडू दिविज शरण यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.
Cricketers Ishant Sharma and Deepti Sharma, athlete Dutee Chand, shooter Manu Bhaker among 27 sportspersons to be conferred with Arjuna Award. https://t.co/X2d7SNSc7j
— ANI (@ANI) August 21, 2020
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी बक्षीस रकमेमध्ये क्रीडा मंत्रालय मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा विचार करीत आहे. विजेत्यांना 15 लाख, तर 'खेलरत्न' पुरस्कार विजेत्यांना 25 लाख रुपये बक्षीस अपेक्षित आहे. सध्या खेलरत्न 7.5 लाख रुपये रोख, तर अर्जुन पुरस्कारप्राप्त व्यक्तींना 5 लाख रुपये इतके रोख पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. मंत्रालय या प्रस्तावास अंतिम टच देण्यात व्यस्त असल्याचे कळविण्यात आले आहे.