MS Dhoni. File Image. (Photo Credits: Facebook)

भारताचा पूर्व कर्णधार महेंद्र सिंग धोनी (M.S Dhoni)  याने क्रिकेट मधून दोन महिन्यांची सुट्टी घेऊन भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंट (Indian Army Parachute Regiment) सोबत प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. या इच्छेला आज सैन्याचे प्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार येत्या काही काळात धोनी जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir)  मध्ये सैन्यासोबत प्रशिक्षण घेणार आहे मात्र धोनीला सैन्याच्या कोणत्याही थेट ऑपरेशन मध्ये सहभाग घेता येणार नाही असेही आर्मिकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ANI ट्विट

महेंद्र सिंग धोनी याला 2011  साली सैन्याचा मोलाचा सन्मान म्हणजेच लेफ्टनंट कर्नल पद देऊन गौरवण्यात आले होते, तसेच तो सैन्याच्या 106  इन्फंट्री बटालियनचा भाग होता. याशिवाय अनेक प्रसंगी धोनीने आपले सैन्याशी जोडलेले नाते सर्वांसमोर दाखवले होते, मागील वर्षी आपल्याला मिळालेला पद्मा भूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी सुद्धा त्याने आर्मीचा गणवेश परिधान केला होता. महेंद्र सिंह धोनी पुढील 2 महिन्यांसाठी क्रिकेटविश्वातून घेणार विश्रांती, पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल म्हणून सैनिकांसोबत घालवणार वेळ

दरम्यान, आज वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली होती, धोनीच्या या निर्णयामुळे साहजिकच त्याचा या संघात समावेश नव्हता. याबाबत बोलताना, MSK प्रसाद याने यांनी सांगितले की, धोनीने आपली अनुपलब्धी दर्शवली होती, तसेच विश्वचषकानंतर संघ निवडीच्या बाबत अनेक बदल करण्याचे सुद्धा ठरवण्यात आले होते,यानुसार आता संघात रिषभ पंत सारख्या तरुण खेळाडूला स्थान देऊन तयार पुढील सामन्यांसाठी तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.

विश्वचषक दौऱ्यानंतर अनेक माध्यमातून धोनी निवृत्त होणार का यावर प्रश्न केले जात होते, मात्र याबाबत धोनीने कोणतीही पुष्टी केलेली नाही, तसेच प्रसादड यांनी यावर धोनी हा स्वतः अनुभवी खेळाडू असून, त्याला निवृत्त कधी व्हायचे ते कळते असे म्हंटले आहे.