ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मायकल क्लार्क याने पत्नी कायलीला दिला घटस्फोट; पोटगी म्हणून पत्नीला द्यावे लागणार 192 कोटी
Michael Clarke Announces Divorce With Wife Kyly (PC - getty)

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मायकल क्लार्कने (Michael Clarke) आपली पत्नी कायली (Kyly Clarke) हिला घटस्फोट (Divorce) दिला आहे. लग्नाच्या सात वर्षानंतर क्लार्कने हा निर्णय घेतला आहे. कायली आणि क्लार्क यांना एक मुलगीही आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील संबंध बिघडले होते. त्यामुळे क्लार्कने आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 'व्हेलेंटाईन डे' अगोदरचं क्लार्कने हा निर्णय घेतल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

ऑस्ट्रेलियान मीडियाने दिलेल्या बातम्यांनुसार, मायकल क्लार्कने पत्नी कायलीशी घटस्फोट घेतला आहे. क्लार्कने सोशल मीडियावर या वृत्ताला दुजारा दिला. सात वर्षांपूर्वी क्लार्कचा विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील संबंध बिघडले होते. त्यामुळे गेल्या 5 महिन्यांपासून ते दोघे वेगळे राहत होते.  (हेही वाचा - Every Indian Should Know Hindi! सुनील गावस्कर यांच्या हिंदी भाषेवरून रणजी ट्रॉफी सामन्यात झाला वाद, म्हणाले भारतात राहणाऱ्यांना हिंदी येणे गरजेचं, (Watch Video))

 

View this post on Instagram

 

🐎 @kylyclarke

A post shared by Michael Clarke (@michaelclarkeofficial) on

या घटस्फोटाबद्दल मायकल क्लार्कने सांगितले की, 'गेल्या काही महिन्यांपासून आमच्यामध्ये वाद सुरू होते. त्यामुळे दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांच्या आनंदाचा विचार करून हा निर्णय घेतला आहे,' असेही क्लार्क म्हणाला. या घटस्फोटानंतर मायकल क्लार्कला आपल्या पत्नीला पोटगी म्हणून पत्नीला 192 कोटी द्यावे लागणार आहेत.

मायकल क्लार्कचे आपल्या सहाय्यकासोबत अफेअर असल्याच्या चर्चा ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये पसरल्या होत्या. त्याच्या सहाय्यकाचे नाव साशा आर्मस्ट्राँग आहे. 2018 मध्ये क्लार्क आणि साशाचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक असून त्याने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवले होते.