मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढत आज (9 मे) संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधील हा 34 वा सामना असेल. आतापर्यंत या संघांमधील सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने 19 सामने तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 सामने जिंकले आहेत. म्हणजेच मुंबई इंडियन्सचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, त्यांच्यामध्ये झालेल्या मागील चार सामन्यांमध्ये आरसीबीने सर्व सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या या मोसमातही दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. 2 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा एकतर्फी पराभव केला.

या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या, प्रत्युत्तरात आरसीबीने 22 चेंडू बाकी असताना 8 गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सची ताकद फलंदाजी आहे. रोहित शर्मा वगळता इतर सर्व फलंदाज लयीत दिसत आहेत. इशान किशनपासून सूर्यकुमारपर्यंत, तिलक वर्मा, कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिड जवळपास प्रत्येक सामन्यात वेगवान फलंदाजी करत आहेत. हेही वाचा Chris Jordan Joins Mumbai Indians: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डन मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल, 'या' खेळाडूची घेणार जागा

या संघाचा फिरकी विभागही ठीक आहे पण वेगवान गोलंदाजी कमकुवत आहे. जोफ्रा आर्चरशिवाय इतर वेगवान गोलंदाजांकडून फारशी अपेक्षा करता येणार नाही. आरसीबीची टॉप ऑर्डर खूप मजबूत आहे. कोहली, डुप्लेसिस, मॅक्सवेल आणि लोमरर यांच्यापैकी दोन-तीन फलंदाज जवळपास प्रत्येक सामन्यात धावत असतात. या संघाची गोलंदाजीही संतुलित आहे. सिराज, हेझलवूड, हर्षल आणि विजय वेगवान गोलंदाजीत आपली कामगिरी चोख बजावत आहेत.

हसरंगाने फिरकी विभाग उत्तम प्रकारे हाताळला आहे. या संघाची कमकुवत दुवा म्हणजे मध्यम आणि खालच्या फळीतील फलंदाजी. चौथ्या क्रमांकानंतर या संघाचा एकही फलंदाज छाप पाडू शकला नाही. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत 10-10 सामने खेळले असून 5-5 जिंकले आहेत. म्हणजेच हे संघ तुल्यबळ फॉर्ममध्ये आहेत. मात्र, मुंबईचे फलंदाज ज्या पद्धतीने रंगत आहेत ते पाहता आरसीबी थोडा मागे पडलेला दिसत आहे. मुंबईच्या वेगवान गोलंदाजीनेही सरासरी कामगिरी केली तर हा सामना मुंबईच्या नावावर होऊ शकतो.