काल आयपीएलच्या 12 (IPL 12) व्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. कालच्या सलामीच्या लढतीमध्ये चेन्नईने बंगलोरवर मात केली. आज या सीझनमधील आपला पहिला सामना खेळण्यासाठी कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) सज्ज झाले आहेत. इडन गार्डन्स मैदानावर सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध सायंकाळी 4 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. दोनवेळा चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता संघाने 2014 मध्ये गौतम गंभीरच्या कर्णधारपदावर शेवटचा जेतेपदाचा किताब जिंकला होता. यावर्षी संघातील वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्याचा तोटा संघाला होतो का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
त्यानंतर सायंकाळी 8 वाजता तीन वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आपली मागील वर्षीची निराशाजनक कामगिरी विसरून पुन्हा एकदा या 12 व्या पर्वातील पहिला सामना खेळण्यास तयार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध हा सामना रंगणार आहे. पण हा मोसम सुरु होण्याआधीच मुंबई संघाला एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा हा मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सहा सामन्यांमध्ये खेळणार नाही. विश्वचषकासाठी श्रीलंका संघात स्थान मिळवण्यासाठी मलिंगाने हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: चेन्नई सुपर किंग्स संघाचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 7 गडी राखून दणदणीत विजय)
दिल्ली संघाने यंदा आपले नावही बदलले आहे. पूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स असे नाव असलेला हा संघ आता दिल्ली कॅपिटल्स नावाने आयपीएलमध्ये भाग घेईल.
आजच्या दोन्ही सामन्यातील संघ –
कोलकाता: दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनील नरेन, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रॅथवेट, जो डेन्ली, लॉकी फर्ग्युसन, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, हॅरी गर्नले, कुलदीप यादव, पीयूष चावला, नीतीश राणा, संदीप वॉरियर्स, केसी करियप्पा, शुभमन गिल, श्रीकांत मुंडे, निखिल नाईक, पृथ्वीराज आणि प्रसिद्ध कृष्ण.
हैदराबाद: केन विलियमसन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक शर्मा, जॉनी बेयरस्टो, खलील अहमद, रिकी भुई, बासिल थंपी, श्रीवत्स गोस्वामी, मार्टिन गुप्टिल, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद नबी, शाहबाज नदीम, टी. नटराजन, मनीष पांडे, यूसुफ पठान, रशीद खान, रिद्धिहम साहा, संदीप शर्मा, विजय शंकर, शाकिब अल हसन आणि बिली स्टेनलेक.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, क्रुनाल पांड्या, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, मयंक मारकंडे, राहुल चहर, अनुकृति रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डीकॉक, एव्हिन लुईस, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅकक्लेनेघन, एडम मिल्ने, जेसन बियररेनडर्फ, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर शरण, पंकज जायसवाल, रसिख सलाम, युवराज सिंह.
दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतीया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलिन मुनरो, क्रिस मॉरिस, कगिसो रबादा, संदीप लामिछणे, ट्रेंट बाउल्ट , शिखर धवन, हनुमा विहारी, अक्षर पटेल, इशांत शर्मा, अंकुश बन्स, नाथू सिंह, कॉलिन इनग्राम, शेरफेन रदरफोर्ड, केमो पॉल, जलज सक्सेना, बंडारू अयप्पा.