Sudhir (PC - Twitter)

बर्मिंगहॅममध्ये (Birmingham) सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धेत भारताच्या सुधीरने (Sudhir) आश्चर्यकारक कामगिरी केली. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये (Para Powerlifting) त्याने प्रथमच भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. यापूर्वी भारताला या प्रकारात आतापर्यंत सुवर्णपदक मिळाले नव्हते. सुधीरने 134.5 गुणांसह गेम रेकॉर्ड केला. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सुधीर भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. भारताच्या पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने पुरुषांच्या हेवीवेट प्रकारात 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. 87.30 किलो वजन असलेल्या सुधीरने पहिल्याच प्रयत्नात 14 उंचीच्या रॅकसह 208 किलो वजन उचलले.

यानंतर सुधीरने दुसऱ्या प्रयत्नात 212 किलो वजन उचलले. त्याचवेळी सुधीर 134.5 गुणांसह अव्वल राहिला आणि सुवर्णपदक जिंकले. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. यापूर्वी मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ आणि टेबल टेनिस पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले. त्याच वेळी, हे एकूण 20 वे पदक आहे.

भारताच्या मुरली श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने ट्रॅक अँड फिल्डमध्ये रौप्य पदक जिंकले. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे 19 वे पदक आहे. श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत 8.08 मीटरची सर्वोत्तम उडी मारून रौप्यपदक जिंकले. हेही वाचा Cricket in Olympic Games: ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता; आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती घेत आहे आढावा

भारताच्या लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताला दुसरे पदक मिळवून दिले आहे. श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत 8.08 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह रौप्यपदक जिंकले. यासह श्रीशंकर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील लांब उडी स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.