इतर अनेक गोष्टींनी गाजू वा न गाजू, मात्र 2018 हे वर्ष गाजले ते सेलेब्जच्या लग्नाने. त्यातल्या त्यात डिसेंबर महिन्यात तर तब्बल 6 सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले, यात आता अजून एक नाव समाविष्ट झाले आहे ते म्हणजे भारताची स्टार बॅटमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal). भारताचा बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप (P Kashyap) बरोबर सायना आज विवाहबंधनात अडकली. सायना आणि पी.कश्यप गेले काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. आता कोणताही गाजावाजा न करता, अगदी मोजक्या 100 लोकांच्या सानिध्यात या जोडीचा विवाह संपन्न झाला. लग्नानंतर पाच दिवसांनी म्हणजे रिसेप्शन सोहळा होणार आहे.
Best match of my life ...#justmarried ☺️ pic.twitter.com/cCNJwqcjI5
— Saina Nehwal (@NSaina) December 14, 2018
सायनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच सायनाने आपल्या नात्याचा खुलासा केला होता. पी गोपीचंद बॅडमिंटन अकादमी येथे 2005 साली सायना आणि पी.कश्यप यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर तब्बल 10 वर्षे यादोघांनी एकमेकांना डेट केले.