विश्वचषकमधील पराभव मागे सोडत भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाशी दोन हात करण्यास सज्ज आहे. आज 1 ऑगस्ट रोजी भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघात पहिले टी-20 सामना खेळण्यात येईल. भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिले दोन टी-20 सामने अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये खेळवण्यात येतील. तर तिसरा आणि अंतिम सामने वेस्ट इंडिजमध्ये होईल. विश्वचषकनंतर भारत आणि वेस्ट इंडिज संघातील हा पहिला सामना असणार आहे. हा पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज संघाकडे टी-20 क्रिकेटमध्ये तुफान खेळी करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहे. त्यामुळे या दोघांमधील टी-20 मालिका नक्कीच रंगतदार होणार यात शंका नाही. (IND vs WI: वेस्ट इंडिज दौर्यावर अवघ्या एका विकेटने रवींद्र जडेजा रचणार इतिहास, वाचा सविस्तर)
वर्ल्डकप मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा सामना तुम्ही ऑनलाइन Hotstar आणि Star Sports वर पाहु शकता.
टीम इंडियाच्या विंडीज दौऱ्यादरम्यान भारतीय खेळाडूंची विक्रमांवर नजर असणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना विंडीज मालिकेदरम्यान अनेक विक्रमांना गवसणी घालण्याची संधी आहे. रोहित युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याचा टी-20 मधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढू शकतो. दुसरीकडे, विराट भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला मागे टाकत सर्वात यशस्वी कर्णधार बानू शकतो. यंदाच्या विंडीज विरुद्ध मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना साधी देण्यात आली आहे. धोनीला विश्रांती देण्यात अली आहे आणि त्याच्या जागी रिषभ पंत (Rishabh Pant)याला संघात विकेटकिपर म्हणून स्थान मिळाले आहे. त्यामुळे धोनीच्या गैरहजेरीत पंत कशी खेळी करतो यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.