पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट बोर्डाचे प्रमुख एहसान मणी (Ehsan Mani) म्हणाले कि ते भारता (India) सोबत क्रिकेट खेळण्यासाठी 'आग्रह' करणार नाही, तरीही त्यांनी द्विपक्षीय क्रिकेट संबंध पुन्हा सुरु वाहावे यासाठी पुन्हा जोर दिला. 'आम्ही भारत किंवा इतर कोणत्याही देशा सोबत क्रिकेट खेळण्यासाठी विनवणी करणार नाही. आम्ही भारतासोबत द्विपक्षीय क्रिकेट संबंध पुनः सुरु करण्यासाठी सभ्य व सन्माननीय पद्धतीने सुरु करु, प्रसारमाध्यमांना सांगत असताना मणी म्हणाले. (IND vs PAK, World Cup 2019 Flashback! 1996 विश्वकप मधील वेंकटेश प्रसाद-आमिर सोहेल यांच्यात झालेला असविस्मर्णीय Face-Off (Video)
भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये 2013 नंतर एकही सिरीज खेळले नाही. मात्र दोन्ही संघ बहुपक्षीय स्पर्धांमध्ये अनेक वेळा खेळले आहेत. भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी येत्या रविवारी म्हणजे 16 जूनला मॅन्चेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर एकमेकांविरोधात खेळणार आहेत. दोन गुण नाही मिळाले तरी चालेल; देशभक्ती महत्त्वाची, अशा तीव्र भावना सोशल मीडियावर व्यक्त होत होत्या.
दरम्यान, पाकिस्तान महिला संघ नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित होणारे आयसीसी महिला चॅम्पियनशिपचे सामने खेळण्याची कबुली मणी यांनी दिली. मणी म्हणाले, याने त्यांना दोन्ही देशातील द्विपक्षीय क्रिकेट संबंध पुन्हा सुरु करण्यास मदद होईल.