(Image Source/BCCI Video Screenshot)

भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan), या दोन देशातील क्रिकेट सामना हे कोणत्याही स्पर्धेचे मुख्य आकर्षण असते. यंदाच्या विश्वकप (World Cup) मध्ये भारत आणि पाकिस्तानी पुन्हा एकदा आमने-सामने येत आहे. या दोन प्रतिस्पर्धी देशांमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी आता काही तसाच शिल्लक आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तान मैच दरम्यान क्रिकेट क्षण असे आहेत जे प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाही आणि त्यातला एक म्हणजे 1996 World Cup दरम्यान झालेलं वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) आणि आमिर सोहेल (Aamir Sohail) मधील Face-Off. (IND vs PAK, ICC World Cup 2019: मॅन्चेस्टर Pitch शी सरफराज अहमद नाखुश, भारताला अनुकूल खेळपट्टी बनवल्याचा आरोप)

1996 विश्वकप मधल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत भारत आणि पाकिस्तान संघ बेंगळुरू (Bengaluru) च्या मैदानात आमने-सामने आले. या मैच दरम्याचं झालेली हि घटना क्रिकेट खेळाडू किंवा चाहते कधीच न विसरणारी होती. वेंकटेश च्या एका बॉलवर चौकार मारल्यावर आमिरने काही आक्रमक भावना व्यक्त करताना आणि त्याला बॉल घेऊन जायला खुणावून सांगितले. शांत आणि एकत्रित डोक्याने, वेंकटेशने पुढचा बॉल डायरेक्ट स्टंपवर टाकला आणि त्याला पॅव्हेलियनला पाठवले. सोहेलच्या विकेटनंतर पाकिस्तानचा उरलेला संघ 288 धावांवर बाद झाला.

विश्वकप स्पर्धेत येत्या रविवारी भारत-पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकला नाही तरी चालेल, पण एकमेकांना हरवा अशीच भावना या दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये असते. आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत सहावेळा दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. मात्र सर्वच्या सर्व सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला.