Photo Credit- X

India National Cricket Team vs Australia PM XI, Pink Ball Warm-up Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन हा दोन दिवसीय सराव सामना मनुका ओव्हल, कॅनबेरा येथे सकाळी 09:30 वाजता खेळला जाईल. दुर्दैवाने, दोन दिवसीय गुलाबी चेंडू सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पहिला पाऊस आणि नंतर खराब फिल्डमुळे भारतीय संघाला गुलाबी चेंडूने सराव करण्याची संधी मिळाली नाही. अहवालानुसार, आज दुसऱ्या दिवशी 50 षटकांचा खेळ होणार आहे. ज्यामध्ये भारताला गुलाबी चेंडूने फलंदाजी आणि गोलंदाजी करावी लागेल. (हेही वाचा:IND vs AUS, Border-Gavaskar Trophy 2024-25: गुलाबी चेंडू कसोटीत टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? रोहित शर्मा आणि कंपनीचे आकडे येथे पाहा )

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हन 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये, रोहित शर्मा आणि शुभमन गिल सारख्या खेळाडूंना, जे पर्थमध्ये खेळले नाहीत, त्यांना गुलाबी चेंडूने खेळण्याची संधी मिळेल. रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्यामुळे तो पर्थ कसोटीला मुकला होता. तर शुभमन गिलला अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले होते. भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात आपली सर्वोत्तम कामगिरी केली. जिथे रोहित शर्मा आणि शुभमन गिलसारखे फलंदाज नसतानाही त्यांनी पॅट कमिन्स संघाचा पूर्णपणे पराभव केला आणि 1-0 अशी आघाडी घेतली.

सामना कुठे आणि केव्हा होणार आहे?

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन हा दोन दिवसीय सराव सामना 30 नोव्हेंबर पासून मनुका ओव्हल, कॅनबेरा येथे सकाळी 09:30 वाजता खेळवला जात.

पिंक बॉल सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पहावे?

स्टार स्पोर्ट्स भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चे अधिकृत प्रसारण भागीदार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हनचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर उपलब्ध असेल.