IND vs PAK (Photo Credit - Twitter)

दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणार्‍या महिला टी-20 विश्वचषक 2023ला (Women's T20 World Cup 2023) धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेला श्रीलंकेच्या हातून उलटसुलट झटके सहन करावे लागले होते. दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (AUS vs NZ) सहज पराभव केला आणि त्यांच्या मोहिमेची चांगली सुरुवात केली. आता शेवटच्या वेळी अंतिम फेरीत पोहोचलेला भारतीय संघ आज पाकिस्तानशी भिडणार (IND vs PAK) आहे. विश्वचषक स्पर्धेत रविवारी होणाऱ्या दोन सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ प्रथम भिडतील. हा सामना भारतात थेट पाहता येईल. तर हा सामना तुम्ही कधी आणि कुठे पाहता येणार जाणून घ्या...

महिला टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 12 फेब्रुवारीला (रविवार) सामना रंगणार आहे. तसेच हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी 6 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे महिला टी-20 विश्वचषकाचे सामने प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता. भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. (हे देखील वाचा: India Beat Australia: भारतीय फिरकी गोलंदांजी समोर ऑस्ट्रेलियाचा संघ गारद, नागपूर कसोटी एक डाव आणि 132 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी)

भारत आणि पाकिस्तानचे संघ

भारतीय महिला संघ: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग, शिखा पांडे, देविका वैद, हरलीन देओल आणि अंजली सरवानी.

पाकिस्तान महिला संघ: मुनीबा अली, सिद्रा अमीन, बिस्मा मारूफ (कर्णधार), ओमिमा सोहेल, निदा दार, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (विकेटकीपर), फातिमा सना, नशरा संधू, जावेरिया खान, आयमान अन्वर, सादिया इक्बाल, आयशा नसीम, तुबा हसन आणि सदफ शमास.