IND vs PAK, ICC World Cup 2019 : मॅन्चेस्टर मध्ये पाऊस पडल्यास तब्बल 100 कोटी जाणार पाण्यात; जाणून घ्या कसे
(Photo Credit: Getty Image)

भारत (India) आणि पाकिस्तानी (Pakistan) संघ रविवारी होणाऱ्या महामुकाबल्या साठी सज्ज आहे. पण, इंग्लंडच्या हवामान खात्यानुसार या मॅचवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे जर पाऊस पडला तर विश्वकपच्या मॅचचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स (Star Sports) वाहिनीच 100 कोटी ची कमाई करण्याचा मानस अपूर्ण राहू शकतो. (IND vs PAK, World Cup 2019: Thanks to MS Dhoni! एम एस धोनीमुळे या पाकिस्तानी चाहत्याला निःशुल्क बघायला मिळणार भारत-पाकिस्तान सामना)

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी स्टारने जाहिरातदारांकडून मोठी रक्कम आकारली आहे. अगदी अखेरच्या क्षणी जाहिरातीचा स्लॉट बुक करण्यासाठी स्टार इंडिया 50% अधिक रक्कम आकारत आहे. सूत्रांप्रमाणे 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 25 लाख रुपये मोजावे लागत आहेत पण भारताच्या अन्य सामन्यातींसाठी दहा सेकंदाच्या जाहिरातीसाठी 16 ते 18 लाख मोजावे लागत आहेत, तर बाकी सामन्यांसाठी केवळ 5 लाख मोजले जात आहेत.

सूत्रं प्रमाणे, स्टारने भारत-पाक सामन्यवर तब्बल 50 कोटींचा विमा काढला आहे. म्हणून, भारत-पाक सामन्यादरम्यान पाऊस पडलाच तर मॅचसह स्टारच्या 100 कोटी कमावण्याच्या हेतूवरही पाणी फिरू शकते. यंदा इंग्लंड (England) च्या बदलत्या हवामानामुळे वर्ल्ड कपचे बरेच सामने रद्द करण्यात आले होते.